पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करतोय : चोडणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 08:51 PM2019-02-02T20:51:49+5:302019-02-02T20:52:27+5:30

आम्ही शिरोडा व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका गंभीरपणो घेतल्या आहेत. येत्या पंधरा ते वीस दिवसांत आमचे उमेदवार ठरतील.

Searching candidates for bye-election goa vidhansabha: congress president girish Chodankar | पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करतोय : चोडणकर

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करतोय : चोडणकर

Next

पणजी : गोवा विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणुका होणार असल्याने आम्ही उमेदवारांची चाचपणी आता सुरू केली आहे, असे गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी येथे लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. आम्ही शिरोडा व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका गंभीरपणो घेतल्या आहेत. येत्या पंधरा ते वीस दिवसांत आमचे उमेदवार ठरतील. आम्ही शिरोडा व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांतील गट समित्यांना उमेदवारांची चाचपणी करण्यास यापूर्वीच सांगितले आहे.

आम्हीही स्वतंत्रपणो स्थितीचा आढावा घेत आहोत, जेणोकरून योग्य ते उमेदवार आम्ही मतदारांसमोर ठेवू शकू, असे चोडणकर म्हणाले.
भाजपने अजून उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्या पक्षाने जरी काँग्रेसच्या दोघा आमदारांना फोडून व दबाव घालून भाजपमध्ये नेले तरी, त्या दोघांना ते तिकीट देण्याची शक्यता आता कमी दिसू लागली आहे. मांद्रेमध्ये लक्ष्मीकांत पार्सेकर यांना तिकीट देण्याचा विचार भाजपने नव्याने सुरू केला असल्याची माहिती आम्हाला कार्यकत्र्याकडून मिळाली. शिरोडा मतदारसंघातही भाजप स्वत:चा उमेदवार बदलू शकतो. त्यामुळे भाजपवर आमचे लक्ष आहे. तो पक्ष जेव्हा उमेदवार जाहीर करील, त्यानुसार आम्ही आमचे उमेदवार ठरवू. तूर्त मांद्रे व शिरोडा या दोन्ही मतदारसंघांमध्ये आमच्या बैठका सुरू आहेत. लोकांना भाजपवर राग आहे. दोन्ही मतदारसंघात भाजप कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, कारण काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये आणून तिकीट देण्याची खेळी भाजपचे काही नेते खेळू पाहतात व कार्यकत्र्याना ते मान्य नाही. भाजपच्या कार्यकत्र्यामधील असंतोषाचा काँग्रेसला लाभ होईल हे उघडच आहे, असे चोडणकर म्हणाले. सुभाष शिरोडकर यांनाच भाजपतर्फे शिरोडय़ात तिकीट दिले जाईल अशी स्थिती नाही, असे चोडणकर यांनी नमूद केले.
 

Web Title: Searching candidates for bye-election goa vidhansabha: congress president girish Chodankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.