पणजी: केरळमध्ये यहुदींच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील यहुदींच्या छबाड हाऊसला सुरक्षा देण्यात आली आहे. हमासच्या माजी प्रमुखाच्या व्हर्च्युअल मोडवरील भाषणाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये ही स्फोटांची मालिका घडविण्यात आली आहे.
या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याची दखल घेऊन गोवा पोलिसांनी यहुदींच्या गोव्यातील छबाड हाऊसला सुरक्षा दिली आहे. काणकोण तालुक्यात पाळोळे येथे यहुदींचे एक प्रार्थनास्थळ आहे. या प्रार्थनास्थळाला छबाड हाऊस असे म्हणतात. इस्राईल व हमासमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतरही या स्थळासह राज्यातील इतर दोन प्रार्थनास्थळांना सुरक्षा पुरविण्यात आली होती.
गोव्यात एकूण यहुदींची ३ प्रार्थनास्थळे, म्हणजे छाबडा हाऊस आहेत. त्यातील हणजुणे व मोरजी येथे एक-एक आहेत तर काणकोणमधील पाळोळे किनारा भागात एक आहे. हणजुणे व मोरजी येथील छाबडा हाऊस सध्या बंद आहेत. परंतु काणकोणमध्ये चालू आहे. या छाबडा हाऊसमध्ये शनिवार व रविवार असे दोन दिवस प्रार्थना होत असते. त्यामुळे या छाबडा हाऊसला अधिक सुरक्षा द्यावी लागते.