शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

उपद्रवी पर्यटकांचे फोटो पाठवा, कारवाई करू - आजगावकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 5:06 PM

गोव्यात येऊन उपद्रव करणाऱ्या व किनाऱ्यांवर दारूच्या बाटल्या फोडणाऱ्या पर्यटकांविरुद्ध यापुढे पर्यटन खातेच कारवाई करेल, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी येथे लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.

ठळक मुद्देगोव्यात येऊन उपद्रव करणाऱ्या व किनाऱ्यांवर दारूच्या बाटल्या फोडणाऱ्या पर्यटकांविरुद्ध यापुढे पर्यटन खातेच कारवाई करेल - बाबू आजगावकरपर्यटन खात्याचे अधिकारी व पर्यटक पोलीस मिळून ही कारवाई करतील. आपण लोबो यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पर्यटन खात्याचा दोष नाही असे मला सांगितले.

पणजी - गोव्यात येऊन उपद्रव करणाऱ्या व किनाऱ्यांवर दारूच्या बाटल्या फोडणाऱ्या पर्यटकांविरुद्ध यापुढे पर्यटन खातेच कारवाई करेल, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी येथे लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.

पर्यटन खात्याचे अधिकारी व पर्यटक पोलीस मिळून ही कारवाई करतील. आपण पर्यटन खात्याच्या संचालकांना बुधवारीच त्यासाठी काही सूचना केल्या. कायद्यात दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे आपण संचालकांना सूचविले आहे, असे मंत्री आजगावकर म्हणाले. किनाऱ्यांवर पर्यटक सध्या खूप उपद्रव करतात आणि मद्य पिण्याबरोबरच बाटल्याही तिथेच फोडून किंवा आहे त्याच स्थितीत टाकून देतात अशा तक्रारी लोक करत आहेत. कळंगुटचे आमदार तथा भाजपाचेच एक नेते मायकल लोबो यांनीही तशीच तक्रार केली व याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गृह खात्याला थेट दोष दिला. त्याविषयी बोलताना मंत्री आजगावकर म्हणाले, की आपण लोबो यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पर्यटन खात्याचा दोष नाही असे मला सांगितले. गृह खात्याने जी अधिसूचना जारी करायला हवी होती, ती केली नाही असे लोबो यांचे म्हणणे आहे. आता आम्ही पर्यटन खात्यामार्फतच कारवाई सुरू करू. खात्याचे अधिकारी जे किनाऱ्यांच्या क्षेत्रात काम करतात, त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाईल. पर्यटन खात्याशी जोडले गेलेले जे पर्यटक पोलीस आहेत, त्यांचीही मदत घेतली जाईल. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती तातडीने करून घेऊ. 

मंत्री आजगावकर म्हणाले, की जर किनाऱ्यांवर कुणीही पर्यटक दारू पिताना किंवा उघड्यावर स्वयंपाक करताना किंवा किनाऱ्यांवर दारूच्या बाटल्या फोडताना दिसत असतील तर फोटो काढून लोकांनी पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या व पर्यटक पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवावेत. आम्ही अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर करणार आहोत. फोटो मिळाल्यानंतर पर्यटकांविरुद्ध कारवाई केली जाईल. आताही किनाऱ्यांवर जर कचरा साठलेला आहे, असे दाखवून देणारा फोटो लोकांनी पाठविला की, खात्याचे अधिकारी लगेच किनाऱ्याची स्वच्छता करून घेण्यासाठी मनुष्यबळ पाठवतात.

टॅग्स :goaगोवा