लोकमत न्यूज नेटवर्क, माशेल : आरजी पक्षाने गोव्याच्या हिताच्या दृष्टीने संवेदनशील विषयांना प्राधान्य दिले जाईल. म्हादईचे रक्षण, युवकांना नोकऱ्या, गोव्याच्या जमिनी सांभाळून ठेवणे, असे अनेक सामाजिक विषय घेऊन आम्ही लोकांपर्यंत जात आहोत. त्यामुळे प्रतिसाद लाभत आहे, असे आरजीने म्हटले आहे.
माशेल येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना मनोज परब म्हणाले की, माशेल येथील फुले, फळे, भाजी विक्रेते, रिक्षा व मोटारसायकल पायलट व दुकानदारांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्याबरोबर विश्वेश नाईक व शेकडो कार्यकर्ते प्रचारा दरम्यान फिरत होते.
कार्यकर्ते हेच बळ
आरजी प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर गोव्यात एक नवीन क्रांती घडवण्यासाठी पुढे आला आहे. आमचा गोवा राखून ठेवण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी गोवेकरांची साथही तेवढीच महत्त्वाची आहे, असे आवाहन आरजीने केले आहे.
'भोवपाची गरज ना'
ज्यावेळी आम्ही मतदारांच्या भेटी घेतल्या त्यावेळी लोकांकडून प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकांनी तुम्ही "भोवपाची गरज ना, तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितल्याचा दावा आरजीने केला.