शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

करबुडव्यांमागे ससेमिरा

By admin | Published: October 29, 2014 1:05 AM

पणजी : राधा एस. तिंबलो यांच्या कंपनीचे नाव विदेशातील बँक खाते आणि काळ्या पैशांच्या यादीत आल्यानंतर राज्यातील अनेक बड्या खाण कंपन्यांच्या वेगवेगळ्या व्यवहारांविषयी राज्यभर चर्चा होऊ लागली आहे.

पणजी : राधा एस. तिंबलो यांच्या कंपनीचे नाव विदेशातील बँक खाते आणि काळ्या पैशांच्या यादीत आल्यानंतर राज्यातील अनेक बड्या खाण कंपन्यांच्या वेगवेगळ्या व्यवहारांविषयी राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. केंद्र सरकारच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्स संचालनालयाने (डीआरआय) यापूर्वीच राज्यातील सहा कंपन्यांची कथित करचुकवेगिरीबाबत चौकशी चालविली असून काहीजणांविरुद्ध गुन्हेही नोंद केले आहेत. कोणत्या खाण कंपनीने कर चुकविला किंवा चुकविला नाही, ते अजून स्पष्ट झालेले नाही. तथापि, सीमाशुल्क खात्याच्या मुख्य आयुक्तांच्या सहकार्याने केंद्रीय रेव्हेन्यू इंटेलिजन्स संचालनालयाने सीमाशुल्क (कस्टम) कायद्यातील तरतुदींखाली सहा कंपन्यांची चौकशी चालविली आहे. डीआरआयच्या मुंबई क्षेत्राच्या कार्यालयाने साळगावकर ग्रुप आॅफ कंपनीचीही चौकशी चालविली आहे. हे चौकशी काम आता पूर्ण झाले की नाही ते कळू शकले नाही; पण तपासादरम्यान साळगावकर ग्रुप आॅफ कंपनीने पन्नास कोटींची रक्कमही जमा केली आहे. त्याशिवाय मेसर्स फोमेन्तो ग्रुप आॅफ कंपनी, मेसर्स मॅग्नम मिनरल्स अशा काही कंपन्यांचीही डीआरआयने चौकशी चालविली आहे. आॅगस्ट २०१३ मध्येच अलर्ट गोव्यातील खाण कंपन्यांचे व्यवहार आणि करचुकवेगिरीची व महसूलहानीची शक्यता लक्षात घेऊन रेव्हेन्यू इंटेलिजन्स संचालनालयाने (डीआरआय) ८ आॅगस्ट २०१३ रोजीच अलर्ट जारी केला होता. तसे दाखवून देणारी कागदपत्रे ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहेत. केंद्र सरकारच्या महसुलाचे रक्षण करण्यासाठी हा अलर्ट जारी करण्यात आला होता, असे डीआरआयचे म्हणणे आहे. मनी लाँडरिंग प्रकरणीही काही कंपन्यांची चौकशी केंद्र सरकारचे अंमलबजावणी संचालनालय करत असून त्याबाबत यापूर्वी एफआयआरही नोंद झाला आहे. येत्या दि. १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी संचालनालय काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंद करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. राधा तिंबलो यांच्या कंपनीचे नाव सध्या देशभर चर्चेत आहे. त्यांच्या कंपनीचे स्वीस बँकेत बेकायदा बँक खाते असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळविल्याने तिंबलो कंपनी चर्चेत आली. तिंबलो कंपनीच्या अन्य संचालकांची नावेही केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आहेत. तिंबलो कंपनीचे नाव बाहेर येण्यापूर्वीपासून म्हणजे गेल्या एक वर्षापासून करचुकवेगिरीप्रकरणी गोव्यातील काही कंपन्या डीआरआय, सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सीस, सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साईज अ‍ॅण्ड कस्टम्स अशा काही यंत्रणांच्या रडारवर आहेत. (खास प्रतिनिधी)