शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

गोव्याबाहेरील मासळीच्या तपासणीसाठी आंतरराष्ट्रीय एजन्सी नेमणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 5:31 PM

विश्वजीत राणे : 48 तासात अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच

मडगाव : गोव्यात आयात केल्या जाणाऱ्या मासळीत फॉर्मेलिन सापडत असल्याचा आरोप होत असतानाच बाहेरुन येणाऱ्या मासळीची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन प्राधिकरण आंतरराष्ट्रीय एजन्सीची नियुक्ती करणार अशी माहिती या खात्याचे मंत्री विश्र्वजीत राणे यांनी दिली. येत्या 48 तासात या संबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असे सूतोवाचही त्यांनी केले. येत्या 24 तासात यासंदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गोव्यात आयात होणाऱ्या मासळी संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, मच्छीमार मंत्री विनोद पालयेकर, मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा, एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई, पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राणो म्हणाले, माशांच्या आयातीसंदर्भात विरोधक जे आरोप करतात त्यात कसलेही तथ्य नसून त्यांच्याकडून केवळ जोकरगिरी चालू आहे. मात्र त्यामुळे लोकांची दिशाभूल होऊ लागली आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही भारत सरकारची मान्यता असलेल्या आंतरराष्ट्रीय एजन्सीची या तपासणीसाठी मदत घेऊ. गोव्यात पोळे व पत्रादेवी या दोन सीमांवरुन परराज्यातून मासे घेऊन येणारी वाहने आत शिरतात. या दोन्ही चेक नाक्यांवर वाहनांची तपासणी करण्याची तजवीज आम्ही करु. त्याशिवाय दसऱ्यानंतर मडगावच्या होलसेल व रिटेल मासळी मार्केटात एफडीएची पथके कायमस्वरुपी तैनात करु असे त्यांनी सांगितले.

आणखी एक घोटाळा

आयात मासळीतील फॉर्मेलिन तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सी नेमणे हा आणखी एक घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत चोडणकर यांनी मासळी आयातीवर बंदी आणा, या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, ‘बंदी आणली तरच गोमंतकीयांमध्ये आपण जी मासळी खातो ती स्थानिक मासळी आहे आणि सुरक्षित आहे याबद्दल विश्वास निर्माण होईल.’ हे सरकार गोवेकरांच्या सुरक्षेसाठी नव्हे तर मासळी माफियांसाठी वावरत आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला. 

टॅग्स :goaगोवाfishermanमच्छीमार