शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

सात आमदारांना शह

By admin | Published: February 20, 2015 1:26 AM

पणजी : राज्यातील ५0 जिल्हा पंचायत मतदारसंघांची फेररचना करताना सरकारने मतदारसंघांची विविध प्रकारे मोडतोड केली आहे

पणजी : राज्यातील ५0 जिल्हा पंचायत मतदारसंघांची फेररचना करताना सरकारने मतदारसंघांची विविध प्रकारे मोडतोड केली आहे. फेररचना व आरक्षणाद्वारे किमान सात आमदारांना तसेच पंधरा विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांना राजकीयदृष्ट्या शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दहा जिल्हा पंचायत मतदारसंघांची नावे बदलून तेवढेच जुने मतदारसंघ रद्द करण्यात आले आहेत. मतदारसंघ फेररचना व आरक्षणाचा पंधरा विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांना फटका बसला आहे. त्या पंधरापैकी दहा सदस्य हे बिगरभाजप असल्याने त्यांना फटका बसेल अशा पद्धतीने फेररचना व आरक्षण करण्यात आले आहे. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी तर सरकारने मुद्दाम रडीचा डाव खेळल्याची टीका केली आहे. आम्हा विरोधकांना शह देण्यासाठी सरकारने गुपचूप फेररचना व आरक्षण केले, असे रेजिनाल्ड म्हणाले. आमदार पांडुरंग मडकईकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे आदींनीही फेररचनेबाबत नाराजी व नापसंती व्यक्त केली आहे. कुंभारजुवे, साळगाव, चोडण, तिवरे, बांदोडा, कुडणे, मांद्रे, थिवी, कोरगाव, बाळ्ळी असे काही जिल्हा पंचायत मतदारसंघ रद्द केले गेले आहेत. त्याऐवजी थोडे नवे व थोडे जुने भाग घेऊन नवे जिल्हा पंचायत मतदारसंघ तयार केले गेले आहेत. राजकीय समीकरणे बदलावीत या हेतूने ही मोडतोड करण्यात आल्याचे विरोधी आमदारांना वाटते. शिरोडा पूर्वी एसटींसाठी आरक्षित होता, तो आता कुणासाठीच आरक्षित नाही. सांताक्रुझ हा एसटींसाठी अगोदर आरक्षित होता, तो आता महिलांसाठी राखीव झाला आहे. वेळ्ळी हा ओबीसींसाठी राखीव होता, तो आता ओबीसी महिला असा राखीव केला गेला आहे. मये हा ओबीसी महिलांसाठी होता, तो आता फक्त ओबीसी राखीव केला गेला आहे. धारगळ हा महिला ओबीसींसाठी आरक्षित होता, तो आता कुणासाठी आरक्षित नाही. सांकवाळ हा ओबीसी-महिलांसाठी आरक्षित होता, तो आता आरक्षणातून पूर्णपणे मुक्त केला गेला आहे. कुडतरी हा महिलांसाठी होता, तोही आरक्षणातून मुक्त केला गेला आहे. शेल्डे हा ओबीसींसाठी आरक्षित मतदारसंघ होता, तो आता महिलांसाठी आरक्षित केला गेला आहे. काही विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांना याचा फटका बसला आहे. मगोचे मंत्री दीपक ढवळीकर, काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, मडकईकर, बाबू कवळेकर, भाजपचे आमदार मायकल लोबो, अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये सरकारने जिल्हा पंचायतींच्या फेररचनेच्या माध्यमातून जास्त हस्तक्षेप केला आहे. केपेत तीनही मतदारसंघ एसटींना केपे विधानसभा मतदारसंघाच्या अखत्यारित येणारे दोन आणि या मतदारसंघाशी संबंध असलेला एक, असे तीन जिल्हा पंचायत मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) आरक्षित करण्यात आले आहेत. केपे विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनला आहे. २०१२च्या निवडणुकीवेळी राज्यभर काँग्रेसविरुद्ध लाट असतानाही काँग्रेसचे बाबू कवळेकर हे केपेतून पाच हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी आता बार्से जिल्हा पंचायत मतदारसंघ तयार केला गेला आहे. तो एसटींसाठी आरक्षित केला गेला. खोला मतदारसंघात नाकेरी-बेतुल पंचायत समाविष्ट करून तोही एसटींसाठी आरक्षित केला गेला. बाळ्ळी-अडणे ही केपेतील पंचायत काढून सासष्टीतील गिरदोली जिल्हा पंचायत मतदारसंघात समाविष्ट केली गेली आहे. गिरदोली एसटी-महिलांसाठी आरक्षित केला आहे. केपेतील जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये काणकोण, सांगे, सासष्टी या तालुक्यांतील भाग सरकारने मुद्दाम घातले असल्याचे कवळेकर यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. (खास प्रतिनिधी)