शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जिल्हाधिका-यांपाठोपाठ एसजीपीडीएचीही सरदेसाईंच्या बांधकामाविरोधात नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 7:32 PM

यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी सरदेसाई यांना 15 दिवसांचा अवधी दिला आहे.

मडगाव: माजी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्या कार्यालयाच्या बांधकामावर बंदी आणण्याची नोटीस उपजिल्हाधिका-यांनी दिलेली असतानाच बुधवारी एसजीपीडीएनेही या बांधकामावर कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस विजय सरदेसाई यांच्या पत्नी उषा सरदेसाई यांच्या नावे जारी केली आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी सरदेसाई यांना 15 दिवसांचा अवधी दिला आहे.एसजीपीडीएचे चेअरमन विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. या बांधकामासाठी अर्ज करताना सरदेसाई यांनी काही कागदपत्रे सादर केली नव्हती त्यामुळे ही नोटीस जारी केल्याचे त्यांनी सांगितले. प्राधिकरणाच्या मागच्या बैठकीत या बांधकामावर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी सरदेसाई यांना नोटीस पाठविण्याबरोबरच या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात यापूर्वी प्रतिक्रिया देताना सरदेसाई यांनी राजकीय सूडबुद्धीने घेतलेला हा निर्णय, असे म्हटले होते.