आघाडीविषयी प्रस्ताव आल्यानंतर योग्य भूमिका घेईन: रोहन खंवटे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 06:03 PM2019-11-30T18:03:47+5:302019-11-30T18:04:37+5:30
महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करायची अशा प्रकारचे विधान मी ऐकले आहे.
पणजी : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करायची अशा प्रकारचे विधान मी ऐकले आहे. मात्र माझ्याकडे तरी कुणाकडूनच तशा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. अगोदर प्रस्ताव येऊ द्या, मग मी त्याविषयी विचार करीन व योग्य तो निर्णय घेईन, असे माजी महसुल मंत्री व विद्यमान अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी खास लोकमतला सांगितले.
खंवटे यांनी स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आणि प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्येही काम केले आहे. ते आता मंत्रिमंडळात नाहीत पण गोव्यातील भाजप सरकारला विविध विषयांबाबत प्रभावीपणो विरोध करणारे एक विरोधी आमदार म्हणून खंवटे गोव्याला परिचित आहेत. त्यांनी राजधानी पणजीपासून एक किलोमीटच्या अंतरावर असलेल्या पर्वरी मतदारसंघातून सलग दोनवेळा अपक्ष निवडून येण्याचा विक्रम केला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रानंतर गोव्यातही राजकीय भूकंप होईल व त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे विधान केले. खासदार राऊत यांनी मगो पक्षाचे गोव्यातील आमदार सुदिन ढवळीकर यांच्याशीही फोनवर चर्चा केली. तथापि, खंवटे म्हणाले, की माङयाशी कुणी संपर्क साधला नाही किंवा चर्चाही केलेली नाही. सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करायला हवा, एकत्रित लढायला हवे या मताचा मी देखील आहे पण माङयाकडे कोणत्याच आघाडीच्या स्थापनेविषयी प्रस्ताव आलेला नसल्याने मी त्याविषयी भाष्य करू शकत नाही. समोर प्रस्ताव नसतानाच त्याविषयी बोलणो हे राजकीयदृष्टय़ा अपरिपक्वपणाचे ठरेल आणि तो अपरिपक्वपणा मी करणार नाही. प्रस्ताव आल्यानंतर मग काय ते पाहू. म्हादई पाणीप्रश्न, मांडवीतील कॅसिनो जहाजे, कोमुनिदाद संस्थेचा भ्रष्टाचार आदी अनेक विषय गोव्यात आहेत व त्याविषयी आपण सातत्याने आवाज उठवत आलो आहोत, असे खंवटे म्हणाले.