शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

शिवोलीत युवतीला जाळले

By admin | Published: May 13, 2017 2:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्कहणजूण : बामणवाडो-शिवोली येथे १८ ते २० वर्षीय अज्ञात युवतीचा जाळून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात

लोकमत न्यूज नेटवर्कहणजूण : बामणवाडो-शिवोली येथे १८ ते २० वर्षीय अज्ञात युवतीचा जाळून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली. बामणवाडो-शिवोली येथे एसएफएक्स हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या मैदानाच्या एका कोपऱ्यात निर्जनस्थळी एक जळालेला मृतदेह पहाटे चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांच्या नजरेस पडला. त्यांनी हणजूण पोलिसांना कळविले. दि. ११ रोजी रात्री अज्ञाताने केरोसीन ओतून मृतदेह जाळला असावा, असा अंदाज आहे. मृतदेहाच्या कंबरेखालचा भाग जळून खाक झाला होता व पाय वेगळे पडले होते. त्यातील एक पाय भटक्या कुत्र्यांनी दूरवर नेऊन टाकला होता. मृतदेहापासून जवळच एक लायटर पडलेला होता. जमिनीवरील खुणांवरून जाळण्यापूर्वी त्या युवतीस फरफटत त्या ठिकाणी आणल्याचे दिसून येत होते. मृतदेहाच्या हातात एक अंगठी होती, तर दुसऱ्या हातात एक धातूची बांगडी होती. नखांवर नेल पॉलिश लावलेले होते. यावरून ती महिला असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.खबर मिळताच हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक संजय दळवी घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर उपअधीक्षक रमेश गावकर, उत्तर गोवा अधीक्षक कार्तिक कश्यप, पोलीस महानिरीक्षक विमल गुप्ता, उपअधीक्षक सेराफिन डायस, निरीक्षक ब्रास मिनेझिस, निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ठसेतज्ज्ञांचे पथकही बोलविण्यात आले होते.उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले की, मृतदेह १८ ते २० वर्षांच्या युवतीचा असावा, असा अंदाज आहे. ही अल्पवयीन युवती असू शकते, असेही ते म्हणाले. वैयक्तिक दुश्मनीतून, प्रेमसंबंधातून किंवा बलात्कार केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी अज्ञात संशयिताने मृतदेह जाळून खून केला असावा. खून करण्यापूर्वी तिला दुसरीकडे मारून या ठिकाणी जाळले असावे, या दृष्टिकोनातून तपासकार्य सुरू आहे. एखादी युवती किंवा महिला हरवल्याची तक्रार नोंद झाली आहे का किंवा तशी घटना घडली आहे का, त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.