शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

नवरात्र विशेष: नऊ रूपांचा साक्षात्कार देणारी मडकई येथील श्री नवदुर्गा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:57 PM

'मडकईकान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मडकईतील श्री नवदुर्गा देवीच्या मखरोत्सवाला वेगळे स्वरूप लाभलेले आहे.

यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क,  फोंडा: अंत्रुज महाल- म्हणजेच फोंडा  तालुका. या तालुक्याला  देव देवतांची भूमी म्हणून ओळखले जाते. या तालुक्यात अनेक देवदेवतांच्या प्रसिद्ध मंदिरांची रेलचेल आहे.कवळे, रामनाथी, बांदोडा, म्हार्दोळ, मंगेशी शिरोडा, बोरी, नागेशी या भागांमध्ये असलेल्या देवीदेवतांच्या मंदिरांमध्ये नवरात्रात एक वेगळाच उत्साह दिसून येतो. 'मडकईकान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मडकईतील श्री नवदुर्गा देवीच्या मखरोत्सवाला वेगळे स्वरूप लाभलेले आहे.

आजही गोव्यातील विविध भागांमध्ये स्थायिक झालेले देवीचे भक्तगण, कुळावी, गावकरी नवरात्र उत्सवाला मखरात बसलेल्या देवीचे  दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात. नवदुर्गा देवीचा मखर उत्सव आकर्षक व देखणा असतो. देवीचे आसन ही दर दिवशी ठरलेले आहे. अश्वारुढ, वाघावर स्वार, मारुती,  हत्ती, नंदी, मोर, गरुड, भारुड, सिंह अशा विविध आसनांत ती दर्शन देते.या नऊ दिवसांत देवीचे शृंगारिक बुद्धिमान, शांतीप्रिय, गती, शौर्य, शक्ती अशी विविध रूपे दाखवली जातात तर शेवटच्या दिवशी देवीचे  रौद्र रूप म्हणजेच दुर्गेचे रूप दाखवले जाते. नवदुर्गा देवस्थानात नवरात्रीला वेगळे वैशिष्ट्य म्हणजे नवमीच्या दिवशी महानवमी म्हणजेच या दिवशी देवीला केळीच्या गब्यापासून वेगळी आरास  केली जाते. महानवमीच्या दिवशी रात्रभर देवीचे मंदिर भक्तगणांसाठी खुले असते. पहाटेपर्यंत देवस्थानात विविध कार्यक्रम उपक्रम राबवले जातात. भजन ,कीर्तन पालखी, उत्सव, तसेच मखरउ त्सव असे कार्यक्रम होत असतात.

नवदुर्गा  देवस्थानात दर महिन्याला  येणारी नवमी उत्सव सर्व गावकरी व भक्तगण मिळून मोठ्या उत्साहाने साजरा करतात. याचप्रमाणे देवीचा जत्रोत्सव हा संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर कर्नाटक, महाराष्ट्र , आंध्र प्रदेश, अमेरिका तसेच अन्य भागामध्ये विखुरलेले आहे. जत्रा तसेच नवरात्री उत्सवाला अन्य राज्यातील देवीचे भक्तगण कुळावी, विशेषता देवदर्शनासाठी येत असतात. याशिवाय गावातील सर्व गावकरी एकत्र येऊन शिगमोत्सवाला नमन घालतात व देवीचा आशीर्वाद घेतात.

टॅग्स :goaगोवाNavratriनवरात्रीNavratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023