किशोर कुबल/पणजीपणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सत्तरी व डिचोली तालुक्यात झालेल्या विक्रमी मतदानाचा हवाला देताना या दोन्ही तालुक्यातच श्रीपाद नाईक यांना ५० हजारांपेक्षा अधिक मतांची लीड मिळेल, असा दावा केला.
राज्यात विक्रमी मतदान होण्यासाठी भाजपने नेमलेल्या तब्बल ३४५०० पन्नाप्रमुखांचेही मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले कि, ‘निवडणूक जाहीर होण्याआधीच आम्ही पन्नाप्रमुख नेमले. पन्नाप्रमुखांची २३८ संमेलने घेतली. मतदारयादीतील प्रत्येक पानामागे एक पन्नाप्रमुख भाजपने नेमला होता. प्रत्येकावर ३० मतदारांची जबाबदारी होती.’
तानावडे म्हणाले कि, ‘संघटनात्मकदृषट्याही बरे वातावरण आम्ही निमार्ण करु शकलो. मुख्यमंत्र्यांकडूनही आभार विक्रमी मतदान झाल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही जनतेचे आभार मानले. तिसय्रा टप्प्यातील मतदानात आसामात सर्वाधिक मतदान झाले. गोवा दुसय्रा स्थानी आला. निवडणूक आयोगानेही मतदानासाठी बय्रापैकी जागृती केली. ग्रीन बूथ, इको फ्रेंडली मतदान केंद्रे उत्साहवर्धक वातावरण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.