परवानगी नसलेले डान्सबार बंद पाडा; गोवा खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 04:45 PM2023-12-13T16:45:26+5:302023-12-13T16:46:34+5:30

डान्सबार बंद पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. 

Shut down unlicensed dance bars HC in goa | परवानगी नसलेले डान्सबार बंद पाडा; गोवा खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय

परवानगी नसलेले डान्सबार बंद पाडा; गोवा खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय

वासुदेव पागी,पणजी : किनारी भागातील अंधाधुंध कारभाराचा एक नमुना उघडा पाडताना न्यायालयाने वैध परान्याशिवायच चालणाऱ्या कळंगूट मधील काही डान्सबारांना उघडे पाडले. हे सर्व विनापरवाना सुरू असलेले डान्सबार बंद पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दिला आहे. 

कळंगुट परिसरात काही ठिकाणी बेकायदेशीररित्या डान्सबार सुरू असल्याचे आढळून आले आहे. बार अॅन्ड रेस्टॉरन्टच्या नावाखाली बेकायदेशीर डान्स बार सुरू आहेत असे आढळून आले आहे. काही नागरिकांनी यामुळे खंडपीठात जनहीत याचिका सादर करून अशा बेकायदेशीर डान्सबारवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान  खंडपीठाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला या पाहणी करण्यास सांगितले. तसेच पाहणी करून परवाने नसलेले डान्स बार तत्काळ बंद करण्याचा आदेश दिला आहे.

याचिकादार सुदेश मयेकर आणि कुंदन केरकर यांनी राज्य सरकार, पर्यटन संचालक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, उत्तर गोवा पोलीस आणि  पर्यटन विभागाचे उपअधीक्षक, कळंगुट पोलीस निरीक्षक, कळंगुट पंचायत, अबकारी खाते, राज्य कर आयुक्त, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पंचायत संचालक, बार्देश गटविकास अधिकारी (बीडीओ), नगरनियोजन खाते, अग्निशमन दल, अन्न व औषध प्राधिकरण यांच्यासह १३ डान्स बार मालकांना प्रतिवादी केले होते. बहुतेक डान्सबारकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प रवाना नाही. तसेच अनेकांकडे स्थानिक ग्रामपंचायतीचाही परवाना नाही असेही याचिकेत म्हटले होते.

Web Title: Shut down unlicensed dance bars HC in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.