लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/फोंडा: इराण, इस्रायल या देशांमध्ये युद्धस्थिती निर्माण झाल्याने सध्या कच्च्या तेलाबरोबरच सोने व चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वसामान्यांना सध्या ते परवडत नाहीत. दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीतील पाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असल्याने दिवाळीत अनेक जण आवर्जून सोन्याचे दागिने किंवा वळे खरेदी करतात. मात्र, चोख सोन्याचा दर ८० हजारांच्या घरात पोहोचला आहे.
दिवाळीत चांदीच्या दागिन्यांची किंवा पूजेच्या उपकरणांची खरेदीही केली जाते. परंतु, चांदी प्रती किलो ९८ हजारांच्या पार गेल्याने तिलासुद्धा सध्या सोन्याचा भाव आला आहे. ही स्थिती कायम राहिली तर लवकरच चांदी एक लाख रुपये प्रती किलो होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
चांदी वाढता वाढता वाढे
चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. २२ व २३ ऑक्टोबर रोजी प्रती किलो चांदी ९६ हजारांच्या आसपास होती, तर आता त्यात सुमारे दोन हजार रुपयांनी वाढ होऊन ती ९८ हजारांच्या पार गेली आहे. इराण व इस्रायल दरम्यानच्या युद्धस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी महागली आहे. चांदीचा दर पुढील दिवसांत एक लाखापर्यंत जाईल, अशी शक्यता सुवर्ण व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.
चांदीसाठी मोजा ९८ हजार
सोन्याच्या तुलनेत चांदी स्वस्त असते, असे मानले जाते. कारण, सोन्याचा दर हा १० ग्रॅमनुसार, तर चांदीचा दर किलोनुसार धरला जातो. मात्र, सध्या १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७८ हजारांच्या पार गेला आहे, तर एक किलो चांदीने ९८ हजार पार केले आहेत. त्यामुळे चांदीला सध्या सोन्याची झळाळी आली आहे.
सोने, चांदीची दिवाळीत खरेदी
यंदा मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, तर २ नोव्हेंबरला पाडवा आहे. पाडव्याला साडेतीन मुहूर्तातील अर्ध्या मुहूर्ताचा मान आहे. त्यामुळे या दिवशी सोने, चांदी खरेदी अत्यंत २शुभ मानली जाते. त्यामुळे लोक सोने किया चांदीची नाणी किंवा एखादा दागिना खरेदी करतात. चांदीमध्ये पैंजण, ब्रेसलेट, कडे, जोडवी, अंगठी यांच्या खरेदीस अधिक पसंती दिली जाते. मात्र, यंदा चांदी महागल्याने तिची खरेदीही महागली आहे.
नाणी खरेदीस पसंती
सोने व चांदी महागल्याने सध्या लोक सोन्याची व चांदीची कमी ग्रॅमची नाणी खरेदी करण्यासाठी सोने व्यापाऱ्यांना आगावू ऑर्डर देत आहेत. मोठा दागिना घेणे अनेकांच्या आवाक्याबाहेर असल्याने ते नाणी खरेदीस पसंती देत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सोन्याचे भाव वाढले तरी ग्राहकांकडून मागणी कायम
सध्या सणासुदीचे दिवस असून लोक त्यानिमित्त सोन्याचे दागिने किंवा सोन्याची नाणी खरेदी करतात. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा हे तीन शुभकार्याचे मंगल मुहूर्त असून या मुहूर्तावर सोने खरेदीही आवर्जून केली जाते. दिवाळीतील पाडव्याचा मुहूर्त हा अर्धा मुहूर्त आहे. शुभमुहूर्तावर काही ग्राहक विशेषतः सोने खरेदी करून लक्ष्मी घरी आणतात. मात्र, सध्या सोन्याचे भाव प्रचंड वाढले असले तरी सोने खरेदी जोरात सुरू आहे.
दिवाळीनंतर तुळशी विवाह झाला की लग्नसोहळ्यांना प्रारंभ होणार आहे. त्यातच प्रतिदिन सोन्याचे भाव वाढत असल्यामुळे आणि लग्नसराईत आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून ग्राहक आताच सोने खरेदी करून ठेवतात, विशेषतः काही ग्राहक घरात विवाहयोग्य मुली असल्यास त्यांच्या लग्नासाठी म्हणून आधीच सोन्याची नाणी किंवा सोन्याचे दागिने घेऊन सोने, चांदीची दिवाळीत खरेदी यंदा मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, तर २ नोव्हेंबरला पाडवा आहे. पाडव्याला साडेतीन मुहूर्तातील अर्ध्या मुहूर्ताचा मान आहे. त्यामुळे या दिवशी सोने, चांदी खरेदी अत्यंत २शुभ मानली जाते. त्यामुळे लोक सोने किया चांदीची नाणी किंवा एखादा दागिना खरेदी करतात. चांदीमध्ये पैंजण, ब्रेसलेट, कडे, जोडवी, अंगठी यांच्या खरेदीस अधिक पसंती दिली जाते. मात्र, यंदा चांदी महागल्याने तिची खरेदीही महागली आहे. ठेवतात. दिवाळी जवळ आल्याने सोन्याच्या खरेदीला प्रतिसाद लाभत आहे. दिवाळीनंतर सोने खरेदीला आणखी जोर येणार आहे. याविषयी फोंड्यातील अंतरा ज्वेलरीचे मालक अवधूत रायकर यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना सोन्याचे भाव वाढण्याची भीती असते. सोन्याचे भाव आणखी वाढले तर आपल्याला परवडणार नाही, या भीतीने ते आधीच खरेदी करून ठेवतात. सध्या सोन्याचे भाव वाढले असले तरी ग्राहकांकडून सोने खरेदीला ५० टक्के प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण दररोज वापरण्यासाठी २० कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करतात.
ग्राहक उज्ज्वला नाईक यांनी सांगितले की, दिवाळीनंतर मुलाचे लग्न असल्यामुळे नववधूला सोने घालण्यासाठी मंगळसूत्र तसेच अंगठी, बांगड्या खरेदी करून ठेवल्या आहेत. सध्या भाव वाढल्यामुळे आणखी खर्च वाढेल, त्यामुळे जमेल तेव्हा घेऊन ठेवणे चांगले आहे. वाढता भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले तरी ते घेण्याशिवाय काहींना पर्याय नाही.