पणजी - किना-यांवरील बेकायदा शॅकवर कारवाईची मोहीम पर्यटन खात्याने उघडली असून बुधवारी गावरावाडो, कळंगुट येथे पाच आणि कांदोळी येथे एक मिळून सहा शॅक जमीनदोस्त करण्यात आले.
कारवाईची ही मोहीम यापुढेही चालूच राहणार असल्याचे खात्याच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. बुधवारी कळंगुट व कांदोळी येथे कडक पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. पर्यटन खात्याने घालून दिलेल्या अटी व नियमांचे भंग करण्याचे प्रकारही काही शॅकवाल्यांकडून होत आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
राज्यात ३५0 हून अधिक शॅक आहेत. उत्तर गोव्यातील किनाºयांवर तुलनेत शॅकसंख्या जास्त आहे. बेकायदा शॅकवर पर्यटन अधिकाºयांची आता करडी नजर राहणार आहे.
गेल्या वर्षी तीन महिने उशिरा शॅकवांटप झाले त्यामुळे व्यावसायिकांचा धंदा बुडाला होता. यंदा ते वेळेत सुरु झाले. सीआरझेडने शॅकांसाठी तीन वर्षांकरिता मंजुरी दिली असल्याने यावर्षी वाटपाबाबत अडचणी राहिल्या नाहीत. किनाºयांवर थाटण्यात येणारे शॅक देशविदेशी पर्यटकांचे मोठे आकर्षण असते.
दरम्यान, किनाºयांवर काचेच्या बाटल्या वापरण्यावर शॅकवाल्यांना निर्बंध घालण्यात आलेले आहेत. शक्य तो काचेच्या बाटल्या वापरण्याचे टाळावे असे परवाने देताना घातलेली आहे. बाटल्या फोडून किनाºयांवर फेकल्या जात असल्याने वाळूतून चालताना त्या पायात घुसून जखम होण्याची भीती असते, असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्यामुळे हे निर्बंध घातलेले आहेत.
मद्यप्राशन करुन व जीवरक्षकांचा इशारा धुडकावून समुद्रात उतरण्याचे प्रकार घडतात त्यातून अनेकदा दुर्घटनाही घडतात.