पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: पणजीत स्मार्ट सिटीची कामे सध्या जोरात सुरु असून ३१ मे पर्यंत ही कामे पूर्ण करण्यासाठी दिलेली डेडलाईन गाठण्याची धडपड सुरु झाली आहे.
सांतिनेझ, मळा, कोर्तीन भागात ही कामे सध्या सुरु आहे. तर ज्या भागांमध्ये या कामांमुळे रस्ते खणले होती, ते रस्ते पूवर्वत केले जात आहेत. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीचे रहिवासीच नव्हे पण व्यवसायिकांना सुध्दा फटका बसत आहे. आर्थिकदृष्टया त्यांनी आपला व्यवसाय गमावल्याचा आराेप व्यवसायित करीत आहेत.
स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी सध्या मोठया संख्येने कामगार काम करीत आहेत. महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी सुध्दा कामगार काम करताना दिसून येत आहेत.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात हे सुध्दा या कामांवर लक्ष ठेवून आहेत. बाबूश यांनी ही कामे ३१ मे पर्यंत पूर्ण केली जातील असे नमूद केले आहे.