सोलर फेरीबोट म्हणजे “मिशन टोटल कमिशन”: काँग्रेसची टीका

By पूजा प्रभूगावकर | Published: June 15, 2024 05:14 PM2024-06-15T17:14:22+5:302024-06-15T17:14:51+5:30

सोलर फेरीबोट म्हणजे “मिशन टोटल कमिशन” हे असल्याचे सिध्द झाल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे नेता अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

Solar ferry is a “mission total commission”: Congress criticism | सोलर फेरीबोट म्हणजे “मिशन टोटल कमिशन”: काँग्रेसची टीका

सोलर फेरीबोट म्हणजे “मिशन टोटल कमिशन”: काँग्रेसची टीका

पणजी: नदी परिवहन खात्याने सुमारे ४ कोटी रुपये खर्च करुन सोलर फेरीबोट खरेदी केली. मात्र या फेरीबोटीचा कुठलाही वापर झाला नाही. यावरुन सदर सोलर फेरीबोट म्हणजे “मिशन टोटल कमिशन” हे असल्याचे सिध्द झाल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे नेता अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

सदर सोलर फेरीबोट खरेदी करण्यासाठी मिळालेली कमिशनची रक्कम राज्याच्या तिजोरीत परत करण्याची जबाबदारी आता तत्कालीन नदी परिवहन मंत्री ​​सुदिन ढवळीकर व विद्यमान मंत्री सुभाष फळदेसाई यांची असल्याची टीका त्यांनी केली.

पक्षाचे नेता अमरनाथ पणजीकर म्हणाले, की तत्कालीन नदी परिवहन मंत्री सुदिन ढवळीकर यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये सौर फेरी बोटींच्या व्यवहार्यतेची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी केरळला गेलेल्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. सदर शिष्टमंडळाने तयार केलेल्या अहवालात गोव्याच्या पाण्यासाठी सौर फेरी बोट उपयुक्त नसल्याचे सुचवले होते. गोव्यातील पाण्याचा जास्त प्रवाह आणि वारंवार होणारे हवामान बदल याचा सौर फेरीबोटीवर प्रभाव होणार असे मतही तज्ञांनी आपल्या अपहवालात नमूद केले होते. मग तरीही ही सोलर फेरीबोट सरकारने खरेदी का केली ? असा प्रश्न त्यांनी केला.

Web Title: Solar ferry is a “mission total commission”: Congress criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.