पणजी: सोनाली फोगाट खून प्रकरणातील मुख्य आरेपी सुधीर सांगवान याचा साथिदार आणि सहआरोपी सुखविंदर याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्थ जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी त्याला ड्रग्ज प्रकरणातही जामीन मिळाला होता आता खून प्रकरणातही त्याला जामीन मिळाल्यामुळे खटल्याचा निकाल लागेपर्यंत तुरूंगातून बाहेर राहण्यास त्याला दारे खुली झावी आहेत.
भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगटची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हत्या झाली होती. आता या प्रकरणात सुखविंदर सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोवा उच्च न्यायालयाने सुखविंदर सिंगला जामीन मंजूर केला आहे. पीए सुधीर सांगवान यांच्यासह सुखविंदर सिंग याला या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले होते. सोनाली फोगटचा गोव्यातील कर्लीज बारमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता, त्यानंतर सोनाली फोगटला रुग्णालयात मृत आणण्यात आले होते. आदल्या रात्री त्याने कर्लीज बारमध्ये उशीरा पार्टी केल्याची बातमीही समोर आली होती. या प्रकरणाचा तपास अनेक महिने सुरू होता. 100 हून अधिक साक्षीदार तपासण्यात आले आणि अनेक सीसीटीव्ही स्कॅन करण्यात आले. डिसेंबरमध्ये सीबीआयने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.