शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार
4
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
5
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
6
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
7
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
8
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
10
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
11
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
12
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
13
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
14
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
15
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
16
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
17
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
18
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
19
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
20
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा

लोकसभा निवडणूकीत दक्षिण गोवा भाजप उमेदवार अभूतपूर्व आघाडीने जिंकणार: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर

By पंकज शेट्ये | Published: April 14, 2023 6:15 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १६ एप्रिल रोजी गोव्यात येऊन २०२४ सालात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची दक्षिण गोव्यातून भव्य स्वरुपात तयारीची सुरवात करणार आहेत.

वास्को: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १६ एप्रिल रोजी गोव्यात येऊन २०२४ सालात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची दक्षिण गोव्यातून भव्य स्वरुपात तयारीची सुरवात करणार आहेत. २०२४ सालात होणाºया लोकसभा निवडणूकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपचे उमेदवार जिकंणार असून दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवाराला तर अभूतपूर्व अशा आघाडीने विजय मिळणार आहे. मुरगाव मतदारसंघातून लोकसभा निवडणूकीला जेवढे मतदान होणार त्यातील ८० टक्के मतदान दक्षिण गोवा भाजप उमेदवाराला होणार असल्याचा विश्वास मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या निमित्ताने बायणा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रम आणि मिरवणूकीवेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच त्यांच्याबरोबर मुरगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, मुरगावच्या नगरसेविका श्रद्धा आमोणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार आमोणकर आणि उपस्थित मान्यवरांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने मुरगाव मतदारसंघातील सर्व ३० बुथवर भाजपतर्फे जयंती साजरी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याची माहीती आमदार आमोकर यांनी दिली. तसेच मुरगाव मतदारसंघातील भाजप कार्यालयात आणि अन्य ठीकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचे सांगितले.

१६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गोव्यात येत असून त्या दिवशी त्यांची दक्षिण गोव्यात जाहीरसभा होणार असल्याची माहीती आमदार संकल्प आमोणकर यांनी दिली. ते त्यादिवशी २०२४ सालात होणाºया लोकसभा निवडणूकीचा गोव्यात दक्षिण गोव्यातून प्रचाराला सुरवात करणार असल्याची माहीती दिली. त्या जाहीरसभेला दक्षिण गोव्यातून अभूतपूर्व अशी लोकांची उपस्थिती असणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दक्षिण गोव्यातील प्रत्येक मतदारसंघातून १ हजार लोकांची उपस्थिती त्या सभेला असावी असे लक्ष आहे. मुरगाव मतदारसंघातून त्या सभेला १५०० हून जास्त लोकांची उपस्थिती असणार असा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला.

एका वर्षात मुरगाव मतदारसंघात भाजप सरकारच्या अंतर्गत उत्तम विकास झालेला असून लोकसभा निवडणूकीत मुरगाव मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठींबा भाजप उमेदवारालाच असणार. २०२४ सालात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत गोव्यातील उत्तर आणि दक्षिण अशी दोन्ही जागा भाजपच जिंकणार असून दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवाराला तर अभूतपूर्व मतांच्या आघाडीने विजय मिळणार असल्याचा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला. दक्षिण गोव्यातील मुरगाव मतदारसंघातून तर जेवढी मते लोकसभा निवडणूकीला पडणार त्यापैंकी ८० टक्के मते भाजप उमेदवाराच्या बाजूने असणार असा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला.