पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: शिमगोत्सवाला राज्यात सुरुवात झाली असून या निमित सोमवारी सकाळी भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी पणजीच्या श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी त्यांचे पती तथा उद्योजक श्रीनिवास धेंपे, पणजी शिमगोत्सव समितीचे मंगलदास नाईक व अन्य उपस्थित होते. पणजीची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा आर्शिवाद घेऊन पल्लवी धेंपे यांनी समस्त लोकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षी श्री महालक्ष्मीला नमन करुन पणजीत होळीला सुरुवात होते.
पल्लवी धेंपे यांना लोकसभेची भाजपने दक्षिण गोव्यातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा रविवारी रात्री उशीरा झाली. लोकसभा निवडणूकीसाठी गोवा भाजपने प्रथमच महिला उमेदवाराला तिकिट दिली आहे. तसेच केडरबाहेर उमेवारी देण्याचाही भाजपचा हा तसा पहिलाच निर्णय आहे, त्यामुळे पल्लवी धेंपे यांचे अभिनंदन होत आहे.