पणजी: गोव्यातील पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को आणि फोंडा या पोलीस स्थानकात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विशेष कोपरे बनविण्यात आले आहेत. पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पणजीत त्याचे उद्घाटन केले. इतर पोलीस स्थानकातही ही व्यवस्था नंतर केली जाणार आहे. बाल कल्याण समितीच्या शिफारशींकार्यवाही करताना पोलीस खात्याकडून ही पावले उचलण्यात आली आहेत. अनेक प्रकारच्या गुन्ह्यात पिडीत बालकांना पोलीस स्थानकात यावे लागते. पोलीस स्थानकात त्यांना योग्य वातावरण मिळावे यासाठी त्यांचे मन रमेल अशी व्यवस्था उभारण्याची शिफारस समितीने केली होती. पणजी पोलीस स्थानकात एका खोलीत तशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यात खेळणी, कार्टुन चित्रे आणि इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. शिवाय मुलांचे मनोरंजन करण्यासाठी कर्मचा-यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. फोंडा, म्हापसा, वास्को आणि मडगावमध्येही तशीच व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अनेक प्रकरणात पीडित मुलांना पोलीस स्थानकात यावे लागते. तसेच ब-याच प्रकारात संशयितांची निष्पाप मुलेही पोलीस स्थानकात येत असतात. त्यांच्या सोयीसाठीही ही व्यवस्था अहे.
गोव्यातील पोलीस स्थानकात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विशेष कोपरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 7:44 PM