समीर नाईक/ गोवा
पणजी : गोव्यात ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आगामी ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी आयोजन समितीने होणाऱ्या क्रीडाप्रकारातील स्थाने निश्चित केली आहेत. एकूण ४९ क्रीडा प्रकारांचे आयोजन या स्पर्धेत होणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारातील लढती पणजी, म्हापसा, मडगाव, फोंडा व वास्कोत होणार आहे. राज्यातील एकूण २६ क्रीडा स्थानांवर या स्पर्धा होणार आहेत. तर गोल्फ, सायकलिंगमधील ट्रॅक रेस व शूटिंग या खेळांचे आयोजन मात्र गोव्यात सुविधा नसल्याने नवी दिल्लीतील क्रीडा संकुलात होतील.
स्पर्धेतील क्रीडा प्रकार व स्थाने खालीलप्रमाणे : वुशू टेबलटेनिस व रोलबॉल (कांपाल मल्टिपर्पझ इनडोअर स्टेडियम), वेटलिफ्टिंग, स्क्वे मार्शल आर्ट व कबड्डी (कांपाल खुले मैदान), ट्रायथलॉन (करंझाळे मिरामार), जलतरण (कांपाल जलतरण तलाव), लगोरी, इंडियन मार्शल आर्ट, गटका, मल्लखांब, पेंचाक सिलाट व योगा (बांदोडकर कांपाल मैदान), रोविंग (वांयगिणी बीच), यॉटिंग (हवाई बीच दोनापावल), बीच व्हॉलीबॉल, बीच हँडबॉल (मिरामार बीच), फॅन्सिंग, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल (शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम), अॅथलेटीक्स व रम्बी (बांबोळी स्टेडियम).
हॉकी (पेडे), बिलियर्ड्स (पेडे), जिम्नॅस्टिक्स, बॉक्सिंग, कुस्ती (पेडे इनडोअर), कॅनोईंग व कयाकिंग, रोविंग (शापोरा नदी), फुटबॉल पुरूष (फातोर्डा), बास्केटबॉल, नेटबॉल, हँडबॉल (मनोहर पर्रीकर स्टेडियम नावेली), सॅपेकटॅकरो, ज्युडो (फातोर्डा इनडोअर), लॉन टेनिस (फातोर्डा), बीच व्हॉलीबॉल (कोलवा बीच), सायकलिंग रोड रेस (वेर्णा- बिर्ला बायपास रोड), मॉडर्न पँटाथ्लोन तायक्वांदो, खो- खो (फोंडा इनडोअर), आर्चरी (अभियांत्रिकी कॉलेज, फर्मागुडी), स्क्वॉश (चिखली), लॉन बॉल्स (चिखली), फुटबॉल महिला (टिळक मैदान, वास्को), गोल्फ (जेपी ग्रीन गोल्फ कोर्स, नवी दिल्ली), सायकलिंग ट्रॅक रेस (इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली), शूटिंग (डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज, नवी दिल्ली).