शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राज्यांतर्गत कदंबही ‘एसी’

By admin | Published: September 11, 2015 1:59 AM

पणजी : पणजी-मडगाव, पणजी-वास्को व मडगाव-वास्को अशा तीन मार्गांवर प्रवासी वाहतुकीसाठी कदंब वाहतूक महामंडळ मोठ्या एसी बसगाड्या सुरू करणार आहे.

पणजी : पणजी-मडगाव, पणजी-वास्को व मडगाव-वास्को अशा तीन मार्गांवर प्रवासी वाहतुकीसाठी कदंब वाहतूक महामंडळ मोठ्या एसी बसगाड्या सुरू करणार आहे. प्रत्येकी १०० प्रवाशांची या बसेस वाहतूक करू शकतील. या एसी बसेसमुळे तीन मार्गांवर कदंबचा प्रवास साधारणपणे २० टक्क्यांनी महागणार असल्याची माहिती मिळाली. सध्या प्रति किलोमीटर कदंबकडून १ रुपया २० पैसे दर आकारला जातो. आपल्याला दीड रुपये तिकीट दर मिळावा, असा प्रस्ताव महामंडळाने सरकारकडे पाठवला आहे. या आधुनिक गाड्या चालविण्यासाठी चालकांना विशेष प्रशिक्षण चतुर्र्थीपूर्वी दिले जाणार आहे. कदंब वाहतूक महामंडळाला सरकार निधी कमी पडू देणार नाही. महामंडळासाठी सरकारने १५० कोटींची तरतूद केली आहे. केंद्र सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ योजनेखाली महामंडळास आणखी २२ बसगाड्या मिळतील व एकूण संख्या ५० होईल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. कदंब महामंडळाच्या ताफ्यात या योजनेखाली गुरुवारी २८ बसगाड्या दाखल झाल्या. मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या उपस्थितीत गुरुवारी या बसगाड्यांचा शुभारंभ करण्यात आला. या २८ वगळता २ एसी मिनी बसगाड्यांचाही मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केला. आंतरराज्य मार्गांवर आगामी काळात चार लक्झरी बसगाड्या सुरू केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या वेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह कदंबचे चेअरमन कार्लुस आल्मेदा, पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर, आमदार नीलेश काब्राल, महापौर शुभम चोडणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कदंबला गेल्या वर्षी सरकारने ५२ कोटी रुपये दिले होते. यंदा दीडशे कोटींची तरतूद केली आहे. यात अनुदान, कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व अन्य खर्चाचा समावेश आहे. कदंबच्या चालक व कंडक्टरांनी जास्त जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रवाशांना स्वत:ची कारगाडी रस्त्यावर आणावी असे वाटू नये या हेतूने आम्ही एसी बसगाड्या रस्त्यावर आणत असल्याचे पार्सेकर यांनी नमूद केले. रात्री नऊ वाजल्यानंतरही राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहायला हवी, असे मत उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी व्यक्त केले. या बसेस अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज असून सुरक्षित प्रवासाकरिता ओळखल्या जातील. बसचा दरवाजा स्वयंचलित (अ‍ॅटोमॅटिक) असून दरवाजा काही कारणाने उघडा राहिल्यास बस पुढे जाऊ शकणार नाही. अशा विविध यंत्रणा त्यात बसविल्या असल्याचे ‘कदंब’च्या सूत्रांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)