पणजी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कडक कारवाईचा धडाका शुक्रवारपासून राज्यभर सुरू केला. दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी पोलिसांनी सुरू केली आहे. विनापरवाना तसेच नशेत वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अशा प्रकारचे गुन्हे नोंदविण्यास प्रारंभ केला आहे. ३0 एप्रिलपर्यंत म्हणजे १५ दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शहरांसह राष्ट्रीय महामार्ग, अंतर्गत रस्त्यांवर ही मोहीम राबविली आहे. त्यासाठी २00 वाहतूक पोलीस तैनात केले आहेत, अशी माहिती अधीक्षक सुमन गोयल यांनी दिली. राज्यात अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना दिसतात. हेल्मेटसक्ती असूनही त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे पोलिसांनी हा विषय अत्यंत गंभीरपणे घेतला आहे. (प्रतिनिधी)
राज्यात ‘तालांव’ धडाका
By admin | Published: April 16, 2016 2:38 AM