शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
3
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
4
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
5
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
7
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
8
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
9
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
10
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
13
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
14
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
15
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
16
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
17
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
18
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
19
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
20
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल

हत्तींचा व्यावसायिक वापर थांबवा, खंडपीठात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 9:22 PM

हत्तींचे व्यावसायिक कामासाठी प्रदर्शन करून कमाविण्याचे धंदे बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल झाली आहे.

पणजी: हत्तींचे व्यावसायिक कामासाठी प्रदर्शन करून कमाविण्याचे धंदे बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल झाली आहे. राज्यात तांबडी सुर्ला, कुळे व इतर काही ठिकाणी हत्तींचा व्यावसायिक कामासाठी उपयोग होत असल्याचा याचिकाकर्त्याचा दावा आहे.कबीर गामा रॉय असे याचिकाकर्त्याचे नाव असून त्यांनी खंडपीठात हत्तींचा गोव्यात व्यावसायिक कमासाठी वापर केला जात असल्याचा दावा केला आहे. विशेषत: तांबडी सुर्ला व इतर काही ठिकाणी असलेल्या फार्ममध्ये हत्तींचा व्यावसायिक कामासाठी उपयोग होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे. पर्यटक या हत्तींच्या पाठीवर बसतात, माहूत हत्तीला अंकुश टोचतो, त्याच्याकडून शारीरिक त्रासाची कामे करून घेतो, असे अनेक दावे करण्यात आलेले आहेत. हा कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट करून हे प्रकार बंद करण्याची मागणी करण्यात अाली आहे.ह्या प्रकरणात सरकारला त्वरित हस्तक्षेप करण्याचा आदेश देण्यात यावा. हे हत्ती अभयारण्यात ठेवण्यात यावेत. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सरकारने करावी. त्यासाठी खंडपीठाने आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारची भूमिका ठेवताना अतिरिक्त अभियोक्ते प्रवीण फळदेसाई यांनी याच मुद्द्यावरून एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय जो निवाडा देईल त्यावरून गोव्याची भूमिका ठरविली जाणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात पुढील सुनावणी १३ आॅगस्ट रोजी होणार आहे.

टॅग्स :goaगोवा