पणजी (गोवा) : मागील काही दिवसांपासून तणावाखाली असलेला ऊसगाव येथील रेंज फॉरेस्ट अधिकारी धरजीत अनंत नाईक हा एक आठवड्यापासून बेपत्ता असल्यामुळे खळबळ उडाली आहे. धरजित याची कार मिरामार - पणजी येथे सापडली आहे. धरजित हा नागेशी फोंडा येथे राहणारा असून त्याची ऊसगाव येथे रेंज फॉररेस्ट अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. ११ जुलै रोजी तो घरातून बाहेर पडला होता, जाताना त्याने आपण कॉटेजमध्ये राहणार असे घरी सांगितले होते. त्यादिवसापासून तो आजपर्यंत परतलेला नाही असे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले आहे.
या प्रकरणात कुटुंबियांनी फोंडा पोलीस स्थानकात अपहरणाची तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेणेसुरू आहे. त्याचा फोनही बंद मिळत आहे. मागील काही दिवसांपासून तो तणावाखाली होता असे त्याचे काही मित्र सांगतात. ११ जुलै रोजी रात्री त्याने घरी आपल्या पत्नीला फोनही केला आहे. त्याची सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी मिळविलीआहे. फोनवर त्याने आपल्याला विश्रांती हवी आहे असे पत्नीला सांगितले होते असे तिने पोलिसांना सांगितले.
त्या मृतदेहामुळे तर्कवितर्कदरम्यान, १२ जुलै रोजी मिरामार किनाऱ्यावर एक मृतदेह असल्याचा कॉल पोलिसांना आला होता. त्यामुळे पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी मृतदेह नव्हता. यामुळे उलटसुलट. तर्क वितर्क केले जात आहेत.