लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: राज्यातील शेंक व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय असून, तो गोमंतकीयांकडे राहावा. मॉडेल शॅक धोरण राबवून पर्यटन खात्याने रॉक व्यवसाय गोमंतकीयांच्या हातातून काढून तो परप्रांतीयांच्या हाती देऊ नये, अशी मागणी विरोधी आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवेळी केली.
सातआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी मॉडेल शॅकमुळे पारंपरिक रॉक व्यवसाय संकटात येईल. या विषयावरून शॅक व्यावसायिकांमध्ये भीती व्यक्त केली जात असल्याचे लक्षवेधी सूचना त्यांनी मांडली होती. या विषयावरून बराच गदारोळही झाला.
आमदार बोरकर म्हणाले की, उत्तर व दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांवर मिळून ३६० शॅक्स आहेत. हे सर्व पारंपरिक रॉक्स असून, त्यावर गोमंतकीय शॅक्स व्यावसायिकांची उपजीविका चालते. मात्र, आता पर्यटन खाते मॉडेल शॅक्स धोरण राबवू पाहत आहे. याअंतर्गत मॉडेल शॅक्स उभारले जातील. त्यासाठी लिलाव प्रक्रिया गोव्याबाहेरील कॉर्पोरेट व्यक्तींना शॅक्स व्यवसायाची दारे खुली होती व हा व्यवसाय परप्रांतीयांच्या हातीजाईल.
गोव्यातील पारंपरिक शॅक्स व्यवसायांना आपला व्यवसाय गमावण्याची भीती असल्याचा आरोप त्यांनी केला. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, गोव्यात शॅक व्यवसाय हा १९७० सालापासून सुरु आहे. मात्र, मॉडेल शॅक धोरणामुळे पारंपरिक शॅक व्यावसायिक हा व्यवसाय गमावण्याची भीती आहे. कारण मॉडेल शॅक उभारण्यासाठी किमान १ कोटी रूपये खर्च आहे, जो विद्यमान गोमंतकीय रॉक व्यावसायिकांना परवडणारा नाही. त्यामुळे परप्रांतीय व्यावसायिकांची यात एंट्री होईल, असा आरोप त्यांनी केला.
बेकायदा वॉटर स्पोर्टस् रोखू: खंवटे
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : वॉटर स्पोर्टस् व्यवसायात स्थानिकांना प्राधान्य देऊ; परंतु बेकायदेशीर वॉटर स्पोर्टस् होऊ देणार नाही, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत सांगितले. आमदार वेन्नी विएगश यांनी वॉटर स्पोर्टस्चा विषय शून्य तासात उपस्थित केला होता.
पारंपरिक वॉटर स्पोर्टस् व्यावसायिकांना ग्राहकांसाठी रांगा करणे सक्तीचे करू नका. तसेच गोवा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला त्यांच्या व्यवसायात हस्तक्षेप करू देऊ नका, अशी त्यांची मागणी होती. पर्यटनमंत्र्यांनी यावर त्यांची मागणी चुकीचे असल्याचे सांगितले.
कारण वॉटर स्पोर्टस्च्या नावाने ते काय करतात हे स्वत: प्रत्यक्ष किनाऱ्यावर जाऊन पाहिले आहे, असे सांगितले. ८०० रुपये किमतीची राईड ३ हजार रुपयांना सांगून लुबाडण्याचेही प्रकार पाहिले असल्याचे ते म्हणाले. सर्वांना सिस्टिम पाळावी लागेल. आज सिंधुदुर्गसारखा जिल्हा वॉटर स्पोर्टस्च्या बाबतीत गोव्याशी स्पर्धा करीत आहे. त्यामुळे गोव्याचे नाव या बाबतीत बदनाम होऊ दिले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
याविषयी व्यावसायिकांच्या मागण्या असल्यास त्यांनी त्या सांगाव्यात त्यांच्याशी किंवा त्यांच्या संघटनेशी चर्चा होऊ शकते, असेही ते म्हणाले. दरम्यान, पर्यटन व्यवसायात केवळ गोमंतकीयांनाच परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार वीरेश बोरकर यांनी केली. मोठ्या प्रमाणावर बिगर गोमंतकीयांनी पर्यटन शॅक मिळविले आहेत ही चिंतेची बाब असल्याचेही ते म्हणाले.
व्यावसायिक, आमदारांची बैठक घेऊनच निर्णय घेणार
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, मॉडेल शॅक हे पर्यावरणपूरक असतील. त्यासाठी अगोदर पूर्ण अभ्यास केला जाईल. मॉडेल शॅक धोरण तयार करण्यापूर्वी सर्व रॉक व्यावसायिक व किनारी भागातील आमदारांची बैठक घेऊन चर्चा केली जाईल. पारंपरिक रॉक व्यवसाय गोमंतकीयांकडेच राहिल. रॉक व्यावसायिकांच्या सर्व समस्यांचे या धोरणात निवारण केले जाईल, अशी हमी त्यांनी दिली.
काळ्या सुटावरून लोबो-खंवटे भिडले
काळे सूट परिधान केलेले काही लोक पर्यटन खात्याच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करतात. धोरणात बदल करा, अशी मागणी करून ते भेटायला येतात, असा आरोप कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केला. त्यावर पर्यटन मंत्री रोहन खंवटे चांगलेच भडकले. काळ्या सुटामधील ते लोक कोण? हे लोबो यांनी सांगावे, असे त्यांनी सुनावले. मात्र आपण तसे काहीच म्हटले नाही, अशी पलटी लोबो यांनी मारली. खंवटे मात्र काळ्या सुटातील व्यक्तींची नावे सांगा, यावर ठाम राहिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"