शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

महाविद्यालया बाहेर विद्यार्थ्यांचा चाकू सूरे घेऊन गोंधळ; कुजिरा संकुलात दुसऱ्यांदा फ्रीस्टाईल हाणामारी 

By वासुदेव.पागी | Published: April 03, 2024 5:07 PM

विद्यालये महाविद्यालया गुंडगिरी करण्याचा हा सलग दुसरा प्रकार आहे. दीड वर्षांपूर्वी याच महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील काही विद्यार्थ्यांनी पूर्वी त्यांच्या कँन्टीनमध्ये आणि नंतर भररस्त्यावर फ्रीस्टाईल हाणामारी केली होती.

पणजी: कुजिरा स्कूल कॉंप्लेसमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची रस्त्यावर फ्रीस्टाईल हाणामारीचा धक्कादायक प्रकार घडला. धारधार चाकू घेऊन हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला आहे.

हा प्रकार दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास कुजिरा - बांबोळी येथील शाळा समुहाच्या पार्कींगच्या जागेवर घडला. याच ठिकाणी असलेल्या एका महाविद्यालयातील मुलात जोरदार हाणामारी जुंपली. इतकी हाणामारी झाली की तिथे असलेल्या काही दुचाक्या आणि इतर गाड्यांचीही मोडतोड झाली. नंतर बरोबरच्या काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून हे भंडण सोडविलेही, परंतु त्यानंतर काही वेळाने पुन्हा बाचाबाची आणि नंतर पुन्हा हाणामारी सुरू झाली. यावेळी एका विद्यार्थ्याने धारधार चाकू बाहेर काढला आणि  मारण्याची धमकी देऊ लागला. तितके करून तो थांबला नाही तर त्याने एका विद्यार्थ्यावर हल्लाही चढविला. तो विद्यार्थी थोडक्यात बचावल्याची माहिती ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांकडून सांगण्यात आली. 

चाकू हल्ला करणाऱ्याची ओळख पटलीदरम्यान एका विद्यार्थ्याने जेव्हा चाकू बाहेर काढला होता तेव्हाच तेथील काही जणांनी या प्रकाराची माहिती पोलीसांना दिली होती. त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि काही विद्यार्थ्यांनाही गाडीत भरून आगशी पोलीस स्थानकात घेऊन  गेले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून नंगा नाच करणाऱ्या विद्यार्थ्याची ओळखही पोलिसांना पटली आहे. तो अल्पवयीन नसल्यामुळे त्याला केव्हाही अटक केली जाऊ शकते. तो सध्या अटक चुकविण्यासाठी लपून असल्याची माहिती पणजीचे पोलीस अधीक्षक सुदेश गावडे यांनी दिली 

हा प्रकार सलग दुसऱ्यांदाविद्यालये महाविद्यालया गुंडगिरी करण्याचा हा सलग दुसरा प्रकार आहे. दीड वर्षांपूर्वी याच महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील काही विद्यार्थ्यांनी पूर्वी त्यांच्या कँन्टीनमध्ये आणि नंतर भररस्त्यावर फ्रीस्टाईल हाणामारी केली होती. 

टॅग्स :Studentविद्यार्थीPoliceपोलिस