पणजी: सुदिरसूक्तासाठी सर्वच आघाड्यांवर लढा उभारणार असल्याचे ‘सुदिरसूक्त जागोर’ या साहित्यिकांच्या मंचाने जाहीर केले आहे. त्यात लेखक व प्रकाशकाचा जाहीर सत्कार, सुदिरसुक्तांतील कवितांचे जाहीर वाचन आणि महामेळाव्यांचा समावेश आहे. कोंकणी अकादमीचे माजी अध्यक्ष एन शिवदास यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की कोंकणी अकादमीसारख्या स्वायतत्त संस्थेत हस्तक्षेप करून पुरस्कार रद्द करणे आणि आणि बहुसंख्य परीक्षकांचा निर्णय ठोकरून अल्पमताचा निर्णय लादणे या गोष्टी लोकशाहीला धोकादायक आहे. साहित्याच्या बाबतीत तरी असे प्रकार पहिल्यांदाच गोव्यात घडत असून ही गोव्यासाठी लांछनास्पद गोष्ट आहे. परीक्षकाची काही तरी आचारसंहिता असते, ती न पाळता परीक्षकांचा निकाल जाहीर करण्या ऐवजीच तो लोकांमध्ये उघड करणा-या परीक्षकावर कारवाईची मागणी ही केली आहे. अजूनही सरकारने या प्रकरणात रद्द करण्यात आलेले पुरस्कार पुन्हा घोषित करावे अशी मागणीही त्यांनी केली.
सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ सुदिरसूक्त जागोरतर्फे २१ कलमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात कवी विष्णू वाघ यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा विरोध करणे, साहित्यिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा देमे, सुदिरसूक्त पुस्तकाविषयी जागृतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना फेसबूक, वॉट्सेप यांचा वापर करणे, ४० मतदारसंघात सुदिसुक्तमधील कवितांचे वाचन आणि विवेचन, महाविद्यालयातही वाचन व विवेचन, वाघ यांना सार्वजनिक पुरस्कार देणे, पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढणे तसेच मडगाव आणि पणजीत महामेळावे घडवून आणणे या उपक्रमांचा समावेस आहे.
सुदिरसूक्त ५ भाषांतूनसुदिरसक्त पुस्तकाचे महत्त्व कमी करण्याची धडपड जरी काही लोक राजकीय शक्तींना हातीशी धरून करीत असले तरी हे पुस्तक आता सर्वदूरपर्यंत पोहोचले असल्याची माहिती देविदास आमोणकर यांनी दिली. पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर आगुस्तो पिंटो हे करीत असून काम जवळ जवळ पूर्ण झालेले आहे. नारायण खराडे हे मराठीतून, रमिता गुरव या हिंदीतून आणि कल्पना बांदेकर या मालवणी भाषेतून भाषांतरीत करणार आहेत. म्हणजेच कोंकणीसह ५ भाषांतून सुदिरसूक्त उपलब्ध केल जाणार आहे.