पणजी : खाण घोटाळा प्रकरणात एसआयटीने सोमवारी मेसर्स कांतिलाल कंपनीचे माजी अतिरिक्त संचालक मुकेश सगलानी यांची चौकशी केली. माजी आमदार अनिल साळगावकर यांचे पुत्र समीर साळगावकर यांना बुधवारी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. अनिल साळगावकर यांनी आपण प्रकृतीच्या कारणामुळे चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याचे एसआयटीला कळविले आहे. आता त्यांचे पुत्र समीर साळगावकर यांना हजर राहावे लागणार आहे. तसेच माजी मंत्री ज्योकिम आलेमाव यांना गुरुवारी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. गोव्याचे माजी प्रधान वनपाल शशिकुमार यांनाही एसआयटीपुढे हजर राहावे लागणार आहे. त्यांची अरुणाचल येथे बदली झाली असून १ सप्टेंबर रोजी त्यांना एसआयटीकडे उपस्थित राहाण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. खाण प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या देखरेख समितीचे ते अध्यक्ष होते.
समीर साळगावकर यांना समन्स
By admin | Published: August 25, 2015 1:26 AM