शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 7:27 PM

राज्य सरकारची मागणी फेटाळली 

पणजी : नियोजित मोपा विमानतळ प्रकरणात तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मोपा विमानतळाचे बांधकाम सुरु करण्याच्या संदर्भात पडून असलेल्या याचिकांवर सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जावे, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. गेले दहा महिने या विमानळाचे बांधकाम बंद आहे. बांधकाम करणाºया जीएमआर इंटरनॅशनल कंपनीच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकेवर अंशत: सुनावणी घेतलेली आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. गेल्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तज्ञ समितीने केंद्र सरकारला अशी शिफारस केली होती की, आणखी काही कडक अटी घालून या प्रकल्पाला परवानगी दिली जावी. सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प गेल्या २९ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने रखडला आहे. या विमानतळासाठी हजारो झाडे कापावी लागणार असल्याने त्यास न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. शेजारी सिंधुदुर्गतील चिपी विमानतळाबरोबरच घोषित झालेल्या ‘मोपा’चे काम अशा या ना त्या कारणांवरुन रखडतच चालले आहे. हनुमान आरोस्कर व फेडरेशन ऑफ रेनबो वॉरियर्स यांनी दोन वेगवेगळ्या याचिका केंद्र सरकारविरुध्द सादर करुन पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जागेत हा प्रकल्प येत असल्याने काम त्वरित बंद पाडावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. या याचिकेवरुन गेल्या मार्चमध्ये केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाने २८ ऑक्टोबर २0१५ रोजी दिलेला पर्यावरणीय परवाना मोडीत काढत ‘मोपा’च्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तेव्हापासून काम बंद आहे. सुमारे ५५ हजार झाडे कापावी लागणार असा दावा केला जात आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय