फोंडा तालुक्यात काँग्रेसची आश्चर्यकारक मुसंडी; बॅनर, प्रचाराशिवाय मिळाला चांगला 'हात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2024 10:57 AM2024-06-06T10:57:19+5:302024-06-06T10:59:35+5:30

भाजपला भरघोस मते

surprising voting for congress in ponda taluka in goa lok sabha election 2024 | फोंडा तालुक्यात काँग्रेसची आश्चर्यकारक मुसंडी; बॅनर, प्रचाराशिवाय मिळाला चांगला 'हात'

फोंडा तालुक्यात काँग्रेसची आश्चर्यकारक मुसंडी; बॅनर, प्रचाराशिवाय मिळाला चांगला 'हात'

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोडा : मागील २०१९च्या लोकसभा निवडणुकीत फोंडा तालुक्यातील मडकई मतदारसंघातील मतदारांनी दगा दिल्याने दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला होता, त्याचीच पुनरावृत्ती परत एकदा होताना दिसत आहे. तालुक्यात भाजपला भरघोस मतदान झाले. परंतु, तुलनेत मतदारांनी काँग्रेसलासुद्धा 'हात' दिल्याने भाजपचे दक्षिण गोव्याचे सगळे गणित बिघडले.

भाजपला सध्या मते पडली, तेवढीच मते मिळाली असती, मात्र, काँग्रेसला जी अंदाज होता, तेवढी मते मिळाली असती तर पुन्हा फौंडा तालुक्याच्या जोरावरच दक्षिण गोव्याचा भाजपचा उमेदवार जिंकला असता. भाजप नेते व कार्यकत्यांचा अती आत्मविश्वाससुद्धा येथे नडला आहे. त्याचबरोबर काँग्रेसने आश्चर्यकारक मते घेतली. फोंडा मतदारसंघाचा विचार करता इथे भाजपला १२,९७३ मते मिळालीत. येथे काँग्रेस पक्ष सक्षम असाच होता, त्यांनी कामसुद्धा चांगले केले होते, काँग्रेसने इथे कड़वी लढत देताना ८१२७ मते घेतली. ज्यावेळी प्रचारची पहिली फेरी संपली होती, त्यावेळी भाजप नेते किमान सात ते आठ हजारांची आधाही मिळेल, असे सांगत होते. पण तसे घडले नाही.

अस्तित्वच नसतानाही काँग्रेसने घेतली ७५०० मते

शिरोडा मतदारसंघाचा विचार करता इथेसुद्धा किमान दहा हजारांची आघाडी देण्याची भाषा इथली नेते मंडळी करीत होती. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी येथे झोकून काम केले होते. शेवटच्या एका महिन्यात तर त्यांनी अविश्रांत काम केले होते. इथे कॉंग्रेस पक्ष कुठेच नव्हता. येथील काँग्रेसकडे समिती व कार्यकर्तेही नव्हते. त्यामुळे वाटत होते की, जो प्रतिकार होईल, तो आरजी पक्षाकडून होईल. मात्र, येथे ७५०० मते काँग्रेसने मिळवली. शिरोडा मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व नसताना त्यांनी एवढे मते कोणाच्या जोरावर काढली, हा प्रश्न महत्वाचा आहे.

घटले मताधिक्य

भाजपला मागध्यापेक्षा जास्त आघाडी मिळेल, असे खुद्द रवी नाईक सांगत होते. ते सुद्धा जाहीर सभांमधून ७ हजारपेक्षा अधिक मते देणार, असे छातीठोकपणे सांगत होते. मात्र, येथे भाजपला केवळ ४७५० एचडी नाममात्र आघाडी मिळाली आहे. २०१९च्या तुलनेत ही एक तृतीयांश आहे. आरत्री पक्षाचे मात्र येथे पानिपत झाले. विधानसभा निवडणुकीत दोन हजारांच्या आसपास मते मिळवलेल्या या पक्षाला लोकसभेला मात्र फक्त २१४२ मते मिळालेली आहेत.

ढवळीकरांनी शब्द पाळला

मडकई मतदारसंघात मात्र सुदिन जवळीकर यांनी शब्द दिल्याप्रमाणे सर्वाधिक मते भाजपच्या उमेदवाराला दिली आहेत. तथाल १४,७०० मते येथे भाजपला मिळालेली आहेत. इथे सुद्धा काँग्रेस पक्षाला ३,९७४ मते कशी मिळाली, हा संशोधनाचा विषय आहे. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत इथल्या काँग्रेस उमेदवाराला जेमतेम २ हजार मते मिळाली होती. त्यानंतर इथले काँग्रेसचे काम ठप्प होते. असे असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराला जवळजवळ ४००० मते मिळाली.

विजयाची कारणे

काँग्रेसचे उमेदवार विरिवालों फानांडिस यांनी येथे नाममात्र एक महान बैठक घेतली होती. त्यांचा ना वैथे प्रचार होता, ना कुठे बैठका झाल्या होत्या. बॅनरसुद्धा लागले नव्हते. असे असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराला जवळजवळ ४,০০০ मते मिळतात, याचाच अर्थ काहीतरी गडबड झाली आहे. .इथे सुद्धा भाजपमध्ये दोन गट आहेत. दोन्ही गटाची दलजमाई होणे गरजेचे होते. कदाचित तोच फटका बसला नसेल ना, अशी पण शंका आज व्यक्त होत आहे. आरजी पक्षाने मात्र येथे आपले अस्तित्व पुन्हा एकदा दाखयले आहे. आरती पक्षाने येथे २,८०० मते घेतली आहेत, जी विधानसभेपेक्षा फक्त सहाशे कमी आहेत.

पराभवाची कारणे

फोंडा व शिरोडा मतदारसंघात आंतरिया धुसफूस तर चालू झाली नाहीं ना? याची पुसटशी शंका येऊ लागली आहे. दोन्हीं मतदारसंघात पूर्वीचे भाजप कार्यकर्ते व आताचे भाजप कार्यकर्ते असा प्रवाह आहे. दोघांमध्ये है विधानसभेच्या दृष्टीतून घोडे दामटणे सुरू झाले आहे. त्यामुळे अंतर्गत कलहांमधून तर भाजपनेच काँग्रेसला काम केले नसाचे ना? अशी इथे शंका उत्पन्न होत आहे. आरजी पक्षाने इथे चांगली मते काढली आहेत, मात्र, विधानसभेच्या तुलनेत त्यांची निम्मी मते कमी झाली आहेत, तरीही २८०० मते ही चांगलीच आहेत. आरजी व काँग्रेसची मते एकत्र केली तर ती १० हजार ३४८ एवही होतात.
 

Web Title: surprising voting for congress in ponda taluka in goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.