लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : अंत्रुज महालातील प्रसिद्ध असलेला यंदाचा ३६वा स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळेकर संगीत संमेलनाचे आयोजन १४ व १५ डिसेंबर रोजी फर्मागुडी येथे आयोजित केले आहे. हे संमेलन फर्मागुडी येथील गोपाळ गणपती मंदिराच्या प्रांगणात होईल.
या ३६ व्या संगीत संमेलनाच्या आयोजनासंबंधी फोंडा पत्रकार संघ व सम्राज्ञी गिरिजाताई केळेकर संगीत संमेलन समितीची नुकतीच एक बैठक ज्येष्ठ पत्रकार गोकुळदास मुळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष जयंत मिरींगकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय घाटे, रघुनाथ फडके, धर्मानंद गोलतकर, नरेंद्र तारी, अनिल कुमार नायक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत संमेलन आयोजनासंबंधी तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीत संमेलन समिती अध्यक्ष म्हणून जयंत मिरींगकर, आयोजन समिती अध्यक्ष म्हणून धर्मानंद गोलतकर तर स्वागत समिती अध्यक्ष संजय घाटे, कलाकार आयोजन समिती अध्यक्ष म्हणून रघुनाथ फडके, दीपा मिरींगकर, गोकुळदास मुळवी, नारायण नावती, नरेंद्र तारी यांची सल्लागार समितीवर निवड केली आहे. अनिल कुमार नायक सचिव तर कमलाकांत नाईक खजिनदार म्हणून काम पाहतील.
या संमेलनात प्रतिभेयश नामांत गोमंतक व देशातले आघाडीच्या कलाकारांबरोबरच गोमंतकीय नवोदित कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली. संमेलनात देशातील आघाडीच्या कलाकारांना आमंत्रित केले आहे. संगीतप्रेमी रसिकांना सुरांची मेजवानी देण्यासाठी संमेलन समिती आग्रही असेल, असे जयंत मिरींगकर यांनी सांगितले.