लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: पावसाळ्यात कमकुवत बनलेली किंवा योग्य निगा राखण्यात न आलेल्या घरांना धोका निर्माण होत असतो. हा धोका टाळावा व आपले नुकसानही होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या घरांची काळजी घेणे आवश्यक आहे. नुकसान झाल्यानंतर मदत करण्यासाठी सरकार, आम्ही आहोतच. परंतु आपणास नुकसानच होऊ नये यासाठी वेळोवेळी घरांची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोकुळवाडी-साखळी येथील महेश भजे यांच्या घराचा बहुतेक भाग कोसळल्याने त्यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. या घराला लागूनच असलेल्या प्रशांत नाईक व प्रतिभा नाईक यांच्या घरालाही या घटनेमुळे हादरा बसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. या तिन्ही कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३ लाख रूपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना शनिवारी धनादेश वितरीत करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
नगरसेविका विनंती पार्सेकर आणि माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांन पाहणी करून त्यांना तातडीन नुकसानभरपाई मिळावी यासाठ पाठपुरावा केला. अवघ्याच दिवसांमध्य त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्य मंजूर करून घेतले.