शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

धो धो पावसात नळ मात्र कोरडे! म्हापसा, साळगाव, शिवोली, कळंगुटवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 10:01 AM

धो धो पाऊस असतानाही नळाला पाणी न आल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी म्हापशात दरबार भरवून काही तासही उलटले नसताना, उत्तर गोव्याच्या म्हापसा या प्रमुख शहरासह शिवोली, कळंगुट, साळगांवमध्ये नळ कोरडे पडले आहेत. धो धो पाऊस असतानाही नळाला पाणी न आल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात तिळारीचे येणारे गढूळ पाणी फिल्टरिंग करण्यात अडथळे येत आहेत, तसेच वारंवार वीज खंडित होत असल्याने बंद पडणारे पंप यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नळ कोरडे पडल्याने, मोठ्या प्रमाणात याची झळ लोकांना बसली. काही ठिकाणी लोकांना आंघोळीलाही पाणी मिळाले नाही, तर काही भागात अत्यंत गढूळ पाणी आले, ते हातात घ्यायच्या लायकीचे नसल्याचे समोर आले आहे.सोमवारीच बांधकाममंत्री नीलेश काचाल यांनी खात्याच्या वरिष्ठ अधिकांऱ्यासमोर म्हापशात जनता दरबार घेतला. त्यावेळी लोकांनी वरचेवर तोंड द्यावे लागत असलेल्या पाणीटंचाईचा विषय उपस्थित केला होता. मंत्र्यांनी आश्वासनही दिले होते, परंतु या गोष्टीला २४ तासही उलटले नसताना नळ कोरडे पडले.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) संतोष म्हापणे यांनी 'लोकमत'शी बोलताना असे सांगितले की, तिळारीच्या पाणी गढूळ झाले आहे. ते फिल्टर करण्यासाठी अडचणी येतात, शिवाय वरचेवर वीज खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर ते ठीक होईल, तसेच भूमिगत वीज वाहिनीचे काम चालू आहे, ते पूर्ण झाल्यानंतर विजेची समस्या दूर होईल. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात रोज १२० एमएलडी पाणी फिल्टर केले जाते. गढूळ पाणी येत असल्याने हे प्रमाण बरेच घटले आहे. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

अस्नोडातील प्रकल्पात बिघाड

अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात कच्चे पाणी खेचणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली. त्यामुळे तालुक्यातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. पावसामुळे वाहिनीच्या दुरुस्ती कामात अडथळे निर्माण झाले आहेत, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत आहे. लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने दुरुस्ती काम हाती घेण्यात आले असून, पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न केला जात आहेत.

काँग्रेसचा आज घागर मोर्चा

बार्देश तालुक्याला होणारा पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आज बुधवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी दिला आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडत असताना लोकांना पाणी मिळत नाही, हे सरकारचे अपयश आहे. सरकारकडून घेण्यात येणारा जनता दरबार ही लोकांची दिशाभूल करण्यासाठी होता. असाही आरोप भिके यांनी केला.

आज पुरवठा होणार सुरळीत

अस्नोड्यातील प्रकल्पातील पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील एका अभियंत्याकडून मान्य करण्यात आले. तसेच पाण्यात गढूळपणा निर्माण झाल्याने शुद्धीकरणाची समस्या निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली. बुधवारपर्यंत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही सांगण्यात आले.

म्हापसा पालिका क्षेत्राबरोबर शिवोली मतदारसंघ साळगावच्या काही भागांतील पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ज्या भागात पुरवठा सुरू आहे. त्या भागात काही प्रमाणात गडूळ पुरवठा होत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. जे पाणी पुरवले जाते, ते पिण्यास योग्य नसल्याचेही सांगण्यात आले. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला अखंडितपणे पुरवठा व्हावा, यासाठी तेथे भूमिगत वीजवाहिनी घालून पुरवठा सुरु करण्यात आला होता, पण भूमिगत वाहिनीतील पुरवण्यात बिघाड झाला. आरएमव्ही युनिट दोन दिवसांपूर्वी खराब झाल्याने होणारा ओव्हरहेड वाहिनीवरून पुरवठा केला होता, अशी माहिती डिचोलीतील सहायक अभियंता सावंत यांनी दिली. म्हापशातील काही भागांतल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून धुळेर शेट्येवाडा, डांगी कॉलनीतील काही भागांना पुरवठा आलाच नसल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाmonsoonमोसमी पाऊस