लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्यात पारंपरिक शिगमोत्सवाला सुरुवात झाली आणि होळी साजरी करण्यापूर्वीच स्वयंपाक गॅस दरवाढीचा झटका बसला. एक सिलिंडर रिफिल घरपोच मिळविण्यासाठी गोमंतकीयांना १,११७ रुपये मोजावे लागणार आहेत.
स्वयंपाक गॅसची किंमत ५० रुपयांनी वाढविण्यात आली आहे. ही दरवाढ याअगोदरच जाहीर करण्यात आली होती, बुधवारपासून त्याची अंमलबजावणी सुरूही झाली. यापूर्वी स्वयंपाक गॅस रिफिल घरपोच मिळविण्यासाठी १,०६७ रुपये लागत होते. आता त्यासाठी ५० रुपये अधिक आकारले जात आहेत. ग्रामीण भागात डिलिव्हरी चार्जेस अधिक आकारले जात आहेत. या निर्णयामुळे स्वयंपाक करण्यासाठी घरगुती तसेच रेस्टॉरंटमध्ये होणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. घरी स्वयंपाक करून जेवणे आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणे हे दोन्ही आता महागले आहे. जी बे सबसिडीवर स्वयंपाक गॅस घेतात त्या कुटुंबांना नियमानुसार दर वर्षाला १४.२ किलो वजनाचे १२ सिलिंडर रिफिल करून घेता येतात.. म्हणजेच सरासरी महिन्याला एक सिलिंडर असे हे प्रमाण आहे. परंतु त्यापेक्षा अधिक सिलिंडर घेतले तर त्यासाठी नवीन दर लाग होतात.
व्यावसायिक सिलिंडरही महागला
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली असून, त्याची वाढ तब्बल ३५० रुपयांनी वाढली आहे. ३५० रुपयांनी महागल्यानंतर राजधानी पणजीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २,११८ रुपये इतकी झाली आहे. यापूर्वी १,७६८ रुपयांना ते मिळत होते. व्यावसायिक सिलिंडरचे वजन हे १९ किलो असते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"