काशिराम म्हांबरेम्हापसा : स्थलांतरीत लोक तसेच कामगार वर्गाचा राज्यातील विविध भागात घडत असलेल्या गुन्हेगारी प्रकरणात हात असल्याचे आढळून आल्यानंतर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर कोलवाळ पोलिसांनी थिवीतील लाला की बस्ती येथे भाडेकरू तपासणी मोहीम हाती घेतली. मोहिमे दरम्यान तेथे भाड्याने राहणाºया सुमारे ९६ भाडेकरुंनी आपली रितसर रितसर नोंदणी केली नसल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे त्याच्या विरोधात सीआरपीसीच्या कलम ४१ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
माडेल - थिवी येथेअसलेल्या या वादग्रस्त अशा लाला की बस्तीत येथे गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम हाती घेण्यात आली होती. मोहिमे दरम्यान तेथे भाड्याने राहणाºया सुमारे ९६ हून जास्त भाडेकरुंनी तसेच भाडेकरुंच्या मालकांनी त्यांची रितसर नोंदणी केली नसल्याचे पोलिसांना आढळून आले.
अधिक्षक अक्षत कौशल तसेच उपअधिक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या या मोहिमे दरम्यान परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होती. या मोहिम दरम्यान पोलिसांकडून प्रत्येक घरा घरात जाऊन भाड्यावर राहण्यांची पडताळणी केली. कायद्यानुसार भाडेकरु म्हणून नोंदणी न केलेल्यांना तसेच योग्य कागदपत्रे सादर न केलेल्यांना पोलीस स्थानकावर आणून त्यांची चौकशी यावेळी करण्यात आली.
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याच्या हेतूनेघडलेल्या गुन्ह्यांचा तातडीने शोध लागावा या हेतूनेही मोहीम घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. कोलवाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील इतरही भागात अशा प्रकारची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या पूर्वीही अनेकवेळा या भागातून अशाच प्रकारची मोहिम हाती घेण्यात आली होती.