शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

बासमती तांदळाचा पुरवठा करण्याचं भासवून 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या ठकसेनाला गोव्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 8:50 PM

बासमती तांदळाचा पुरवठा करू असे सांगून गोव्यातील अनेकांना करोडोंचा गंडा घालणा-या अझिम इस्माईल खान (46) या ठकसेनाला मडगाव पोलिसांनी जेरबंद केले.

- सूरज पवार मडगाव: बासमती तांदळाचा पुरवठा करू असे सांगून गोव्यातील अनेकांना करोडोंचा गंडा घालणा-या अझिम इस्माईल खान (46) या ठकसेनाला मडगाव पोलिसांनी जेरबंद केले. गुरुवारी रात्री त्याला पोलिसांनी ताब्यात घेउन नंतर रितसर अटक केली. संशयिताने 2 कोटी 20 लाख 22 हजारांचा आतापर्यंत गंडा घातल्याचे तपासात उघड झाले आहे. हा आकडा आणखीन वाढण्याचीही शक्यता आहे. आपल्याकडील रक्कम खर्च केल्याचे तो पोलीस तपासात सांगत आहे. काल शुक्रवारी त्याला अधिक तपासासाठी न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.मडगाव पोलीस ठाण्याचा ताबा सदया कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्याकडे आहे. परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लॉरिन सिक्वेरा पुढील तपास करीत आहेत. भारतीय दंड संहितेच्या 406 व 420 कलमाखाली अझिम याच्याविरुद्ध मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नावेली येथील गुलशर अहमद मरुफ अहमद हे तक्रारदार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अहमद व त्याच्या एका नातेवाईकांकडून संशयिताने अंदाजे 75 लाख रुपये उचलले होते. बासुमती तांदूळ पुरवू असे सांगून त्याने अनेकांकडून रक्कम घेतली होती. व्यवसायातून मिळालेल्या नफ्फाचा अर्धा - अर्धा हिस्सा वाटून घेणो असा सौदा ठरला होता. लोकांकडून रक्कम घेतली तरी अङिामने तांदुळ पुरवठाचा कधीच व्यवसाय केला नव्हता. दुस-याकडून पैसे उचलून नंतर ते पुर्वी रक्कम घेतलेल्या काही जणांना त्याने दिलेही होते. अझिम हा घोगळ येथे रहात आहे. काहीही काम न करता त्याने अशा प्रकारे तब्बल अडीच कोटींची कमाई केली होती हे आता तपासात उघड झाले आहे.गुलशन याने अझिमकडे धनादेश तसेच ऑनलाईन पध्दतीने व्यवहार केला होता. अन्यजणांनीही अशाच प्रकारे त्याच्याकडे व्यवहार केला होता असे तपासात उघड झाले आहे. संशयित अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. 2018 डिसेंबर महिन्यात त्याने तक्रारदाराकडून रक्कम उचलेली होती. मात्र त्यानंतर त्याने तांदळाचा पुरवठाही केला नव्हता व वरुन रक्कमही अदाही केली नव्हती. आपण फसविलो गेलो आहोत हे लक्षात आल्यानतंर शेवटी गुलशर यांनी मागाहून यासंबधी मडगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंद केली होती.दिलेली रक्कम वायदानुसार मिळत असल्याने अझिमची चांगलीच पब्लिसिटीही झाली होती. रक्कम मिळालेले लोक आपसूकच दुस-यांना अझिमबद्दल सांगायचे, त्यामुळे त्याच्याकडे गुंतवणूक करणा-यांचीही यादी वाढत गेली होती. मात्र नंतर घेतलेली रक्कम परत होत नसल्याने आपण फसविले गेल्याचे अनेकांच्या लक्षात आले. मागाहून या प्रकरणी पोलीस तक्रार नोंद झाली अन शेवटी अझिम पोलिसांच्या तावडीत सापडला. संशयिताचे अन्य कुणाकडे कनेक्शन आहे का याचाही तपास सद्या चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.