मडगाव: मागच्या शुक्रवारी रात्री गोव्यातील मडगावच्या ओल्ड मार्केटमध्ये गोळीबार करणार रसेल डिसोझा हा जामिनावर सुटला आहे. काल सोमवारी त्याला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने सर्शत जामीन मंजूर केला. तीस हजार रुपये व तितक्याच रक्कमेचा एक स्थानिक हमिदार, पोलिस ठाण्यात सकाळी दहा ते दुपारी बारावाजे दरम्यान हजेरी लावण्याशिवाय १५ दिवस मडगावात प्रवेश न करणे, परत त्याच स्वरुपाचा गुन्हा न करणे, न्यायालयाच्या परवानगी शिवाय राज्याबाहेर न जाणे व आपला पासपोर्ट न्यायालयात सादर करणे आदी अटी त्याला घालण्यात आल्या आहेत.
डिपोझीट म्हणून ठेवलेले दोन लाख रुपये दया असे सांगितल्यानंतर रसेल याचे डोके सटकले होते. त्या दुकानवाल्याला धमकाविण्यासासाठी त्याने गोळीबार केला होता. राज्यात साजऱ्या झालेल्या कार्निव्हल महोत्सावात तो किंग मोमो होता. त्याचे ओल्ड मार्केट येथे दुकान होते. ते भाडेपट्टीवर चालविण्यासाठी त्याने हशमत उल्ला याला चालविण्यासाठी दिले होते. दुकानाचा करार संपल्यानंतर डिपोझीटची रक्कम परत देण्यास सांगितले असता, त्याने गोळीबार केला होता. नंतर तो स्वत फातोर्डा पोलिस ठाण्यात शरण आला हाेता.
भादंसंच्या ३०७ व शस्त्रात कायदयातंर्गत त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. एक दिवस त्याला पोलिस कोठडी देण्यात आली होती. कोठडीची ही मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात उभे केले असता, त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मागाहून त्याने जामिनासाठी येथील दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष पुजा कवळेकर यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सोमवारी तो मंजुर करण्यात आला. संशयिताकडील पिस्तुल व तीन काडतुडे पोलिसांनी जप्त केल्या आहेत.