वासुदेव पागी, पणजी: युगांडातील दोन युवती गोव्यात हणजूण येथे ड्रग्स व्यवहारात पकडल्या गेल्या. त्यांचा हा पहिलाच गुन्हा होता. त्यांना गुन्हा माफ करण्यात आला नाही, परंतु न्यायालयाकडून त्यांना सहानुभूती दाखविताना केवळ ९ महिने सश्रम तुरुंगवास ठोठावला आहे.
सान्यु फ्लोरेन्स (२८) आणि नाबान आरीसाट (२६)या युगांडा देशातील युवतींना हणजूण येथे कोकेन व इतर घातक ड्रग्ससह अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर गुन्हे नोंदवून आरोपपत्रही दाखल करण्यात आले. परंतु त्यांनी गुन्ह्यांची कबुली देताना आरोपपत्रातील सर्व गुन्हे कबुल केले. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध खटले चालविण्याची पाळीच आली नाही. पोलिसांनीही त्यांना कठोर शिक्षेचा आग्रह धरला नाही. तसेच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी आढळली नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. या युवतींनी आपल्यावरील आरोपांची कबुली देताना गरीबीमुळे हे काम त्यांना करावे लागल्याचे सांगितले. तसेच या पुढे अशी चूक करणार नाही असे सांगितले तसेच आपल्या देशात परत जाणार असल्याचेही सांगितले. न्यायालयाने त्यांना ९वर्षे सक्त म जुरीची शिक्षा तसेच प्रत्येकी २० हजार रुपये दंड ठोठावला.