किशोर कुबल/पणजी
पणजी : मडगाव येथील दक्षिण जिल्हा इस्पितळात खाजगी मेडिकल कॉलेज उघडणे तसेच खाण डंप धोरणाला मान्यता असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. बैठकीनंतर पत्रकार परिषद बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, 'विश्वस्त संस्था (ट्रस्ट) स्थापन केली जाईल. मुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष असतील व खाजगी मेडिकल कॉलेज असले तरी सरकारचे नियंत्रण राहणार आहे.
दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठकीत खाण डंप धोरणाला मान्यता देण्यात आली. निर्यातदार, लीजधारक यांनाच खनिज डंप इ लिलांवासाठी अर्ज करता येतील, इतरांना नाही, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, या लिलावातून २०० कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे.
मंत्रिमंडळाने संमत केलेल्या इतर निर्णयांमध्ये गोमेकॉत मोफत पॅट स्कॅन सुविधा सुरू करणे, किनाऱ्यांची धूप का होते याची कारणमिमांसा करण्यासाठी एजन्सी नेमणे आदी निर्णयांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेत महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात हेही उपस्थित होते.