गोव्याचे पुढील मुख्यमंत्री हे एसटी समाजाचे असतील - माणिकराव ठाकरे
By पूजा प्रभूगावकर | Published: May 4, 2024 01:30 PM2024-05-04T13:30:50+5:302024-05-04T13:31:17+5:30
कॉंग्रेस हे नेहमीच आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबध्द आहे. त्यांना आमचा पाठिंबा नेहमीच होता व असेल.
पणजी: गोव्यात यापूर्वी एसटी समाजाचा मुख्यमंत्री झालेला नाही. मात्र पुढील विधानसभा निवडणुकीत गोव्याचा मुख्यमंत्री हा एसटी समाजाचा असावा असा कॉंग्रेसचा प्रयत्न असेल असे प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कॉंग्रेस हे नेहमीच आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबध्द आहे. त्यांना आमचा पाठिंबा नेहमीच होता व असेल. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणूकीत गोव्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री हा आदिवासी समाजाचा देण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. केंद्रात कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतरही एसटी समाजाच्या मागण्यांचे दखल घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.
ठाकरे म्हणाले, की आदिवासींचा उल्लेख भाजप हे नेहमीच वनवासी म्हणून करतात. भाजपने आदिवासी समाजाचा नेहमीच राजकीयदृष्ट्या वापर केला. मात्र या समाजाला त्यांचे अधिकार देताना हात मागे घेतला. गोव्यातील एसटी समाज राजकीय आरक्षणाची मागणी करीत आहेत. त्यांच्या या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.