पणजी: राज्यात पुढील तीन दिवस हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पडणार असल्याने मच्छिमाऱ्यांनी खोल सम्रुदात न जाण्याचा इशाराही हवामाने खात्याने दिला आहे. गेले आठ दिवस राज्यात मुसळधार सुरुच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात १ जून ते आतापर्यंत ६८.३३ पावसाची नोंद झाले आहे.
मुसळधार पावसाने ठिकठिकणी पूर
राज्यात गेला आठवडाभर पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पूर आलेला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाेकांची मातीची घरे कोसळली. घरांवर झाडे उन्मळून पडून माेठ्या प्रमाणात लाेकांचे नुकसान झालेले आहे. वित्त हानी प्रमाणे जीवित हानी झाली आहे. गेल्या आठवड्या भरात राज्यात मुसळधार पावसाने ५ जणांचा बळी घेतला आहे. अनेक मुक़्या जनावरांचाही बळी या पावसात गेलेला आहे. तसेच पडझडीमुळे कराेडाे रुपयांची या पुराच्या पावसाने नुकसान झाली आहे.
धरणे भरली नद्यांची पातळी वाढली
राज्यात गेले आठ दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने राज्यातील सर्व धरणे भरली आहे. साळावली धरण भरले तसेच अंजुणे धरण ९० टक्के भरले असून या धरणातून कधीही पाणी साेडले जाऊ शकते. तसेच इतर लहान धरणेही भरली आहेत. धरणाप्रमाणे राज्यातील सर्व नद्या तसेच उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पावसाने नदी किनारी असलेल्या शेती बागायतींना मोठा फटका बसला आहे.
आतापर्यंत ६८.३३ इंच पाऊस
राज्यात १ जून ते १३ जूलै पर्यंत ६८.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर वाळपई केंद्रात ८१.५४ इंच सर्वाधिक जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे साखळी, सांगे, केपे, काणकोण, मडगाव या केंद्रावरही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.