शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कळंगुट-कांदोळीत शॅकना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू

By मयुरेश वाटवे | Published: April 03, 2023 4:45 PM

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने न घेताच चालविल्या जाणाऱ्या पर्यटन शॅकवर कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गेल्या आठवड्यात दिला होता.

पणजी - राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने न मिळविता कळंगुट- कांदोळी किनाऱ्यावरील पर्यटन शॅकना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बार्देश तालुक्याचे मामलेदार प्रवीण गावस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कारवाईत ११३ शॅकना टाळे ठोकले जाणार आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने न घेताच चालविल्या जाणाऱ्या पर्यटन शॅकवर कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गेल्या आठवड्यात दिला होता. त्या आदेशानंतर ४८ शॅक व्यावसायिकांनी मंडळाकडून परवाने घेतले होते. तर राहिलेल्या ११३ व्यावसायिकांनी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने त्यांच्या शॅकना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती गांवस यांनी दिली.आज सोमवारी सकाळी ही कारवाई करण्याची मोहिम सुरू करण्यात आली. 

आदेशाचे पालन करण्यासाठी १० पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात मामलेदाराचा प्रतिनिधी, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिनिधी, पर्यटन खाते, सीआरझेड तसेच इतर संबंधित खात्याच्या प्रतिनिधींचा  समावेश करण्यात आला होता. कारवाई दरम्यान कोणताच अनुचीत प्रकार घडू नये यासाठी किनाऱ्यावर  कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.