मडगाव: एका महिलेच्या घरात बेकायदा जमाव करुन घुसून, तिला धमकी देण्याचा भलतेच धाडस गोव्यातील मडगाव पालिकेच्या एका माजी नगरसेवकाच्या बरेच अंगलट आले. त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागली. पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर रविवारी रात्रीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. खुतुबुद्दीन बागेवाडी असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्यासह पोलिसांनी असिफ आदोनी यालाही अटक केली आहे. तर अन्य तीनजणीवर गुन्हा नोंद केला आहे.
तैफ अहमद या तक्रारदार आहेत. पोलिसांनी खुतुबुद्दीन व असीफ याच्यासह यास्मीन अदोनी, तस्लीम अदोनी व राबिया अदोनी यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक रवी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप पुढील तपास करीत आहेत.
दवर्ली येथे तक्रारदाराचे घर आहे. संशयितांनी बेकायदा जमाव केला. व नंतर त्या घरात घुसले, तक्रारदाराच्या आईला ढकलून दिले, त्याच्या गळयातील सोन्याच्या मंगळसूत्रांची मोडतोड केली. तक्रारदार , तिची आई व बहिणीला मारहाण केली. खुतुबुद्दीनने नक्कल दाखवून मारहाण करण्याची धमकी दिली. त्याने व असिफने तक्रारदाराच्या गळयातील सोनसाखळी व हातातील सोन्याचे ब्रेसलेटची मोडतोड केली. तसेच सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. वैवाहिक वादावरुन वरील प्रकरण घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.