शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

...तर सरकारमधून बाहेर पडू; पेडणे झोनप्रश्नी आमदार जीत आरोलकर यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 3:20 PM

पेडणे येथील भगवती सभागृहामध्ये तालुक्यातील नागरिकांची जमीन आराखडा विरोधी बैठक झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : पेडणे तालुक्यातील जमिनींच्या झोन बदलाचा आराखडा तयार करताना स्थानिक पंचायती, नागरिक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही. हा आराखडा लवकरात लवकर रद्द करावा, अन्यथा मी लोकांसोबत रस्त्यावर येईन. सरकारने माझ्यावर कारवाई केली तरी चालेल. किंवा मला सरकारमधून काढून टाकले, तरी त्याची पर्वा नाही' असा इशारा मांद्रेचे मदार जीत आरोलकर यांनी दिला. याशिवाय 'सरकारने जर प्लॅनिंग झोन रद्द केला नाही तर, आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेने सरकारविरोधात मतदान करावे' असे थेट आवाहनही त्यांनी केले.

पेडणे येथील भगवती सभागृहामध्ये तालुक्यातील नागरिकांची जमीन आराखडा विरोधी बैठक झाली. त्यावेळी आमदार आरोलकर बोलत होते. जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर, मांद्रेचे सरपंच अॅड. अमित सावंत, सामाजिक कार्यकर्ते ट्रोजन डिमेलो, राजन घाटे, गोंयचा आवाज संघटनेचे स्वप्नश शेरकर, तुयेचे सरपंच सुलक्षा नाईक, सरपंच अजय कलांगुटकर, विनडाच्या सरपंच ठाकूर, सदानंद वायंगणकर अॅड. प्रसाद शहापूरकर, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, हरमलचे माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण बानकर आदी उपस्थित होते. शेवटी श्री भगवती देवीला गाऱ्हाणे घालून आंदोलन यशस्वी करण्यासाठी नवस करण्यात आला.

सरकारने पेडणे तालुक्यासाठी झोन बदल आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात स्थानिकांना हवा तसा बदल करावा. अन्यथा तो रद्दच करावा या मागणीसाठी भगवती हायस्कूल सभागृहामध्ये तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची सभा झाली. सभेमध्ये आमदार जीत आरोलकर यांनी सरकारला थेट इशारा दिला. ते म्हणाले, 'सरकारने जनतेला हवा तसा आराखडा तयार करावा. अन्यथा मी जनतेसोबत रस्त्यावर यायलाही मागे पुढे राहणार नाही. जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत विरोधात मतदान करावे. अन्यथा मतदानावर बहिष्कार घालावा.'

यावेळी नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात आमदार आरोलकर यांच्या भूमिकेचे स्वागत केले. आरोलकर म्हणाले, 'आधी पेडणे वाचवण्यासाठी आपण संघटित होऊ. मी सरकारविरोधात बोलत असल्यामुळे कारवाईची शक्यता आहे. परंतु मी घाबरणार नाही. माझ्या दोन जमिनी सेटलमेंट झोनमध्ये घातल्या आहेत. त्या रद्द केल्या तरी चालतील, लोकांसोबत राहाणार आहे. याप्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आराखड्याविषयी चर्चा करूया आणि सरकारला नमते घ्यायला भाग पाहू.'

मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, 'झोन बदल प्रकरणात आमदार आर्लेकर यांचे अज्ञान दिसते. प्लॅनिंग झोनबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. त्यांना जनतेचे देणे-घेणे नसल्याने ते सभेला उपस्थित राहिले नाहीत. मीसुद्धा जनतेसोबत रस्त्यावर यायला तयार आहे.'

मांद्रेचे सरपंच अमित सावंत म्हणाले, जनतेला नको असलेला आराखडा सरकारने लागू केला, तर आम्ही गप्प बसणार नाही. स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनीही गप्प राहू नये. वेळप्रसंगी सरकारने कारवाई केली तरी त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे. आम्ही त्यांच्यासोबत राहू. जनता त्यांना पुन्हा निवडून देईल.

ट्रोजन डिमेलो यांनी सरकार गोव्याच्या हितासाठी सरकार निर्णय घेत नाही. ते सर्वसामान्यांचे नाही. पेडणे तालुक्यातील जनतेने उठाव केला तर राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो. केवळ पेडणे तालुक्याचा हा झोन नसून भविष्यात टप्प्याटप्प्याने सरकार पूर्ण राज्यातील झोन बदलाचे षड्यंत्र आखत आहे' असा आरोपही डिमेलो यांनी केला.

गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर यांनी केवळ लोकप्रतिनिधी नव्हे तर जनतेनेही आता उठाव करण्याची गरज आहे. सरकार आमदारांना विश्वासात न घेता झोन बदलते. मग हे सरकार कोणाच्या बाजूने आहे हे दिसून येते. हा प्लॅन रद्द करावा. ॲड. सीताराम परब, प्रसाद शहापूरकर, सदानंद वायंगणकर, हरमलचे जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर, भास्कर नारुलकर, स्वप्नेष शरलेकर आदींची भाषणे झाली.

आमदार आरोलकर म्हणाले, 'सरकारने तब्बल एक कोटीपेक्षा जास्त जमीन सेटलमेंट झोनमध्ये घातलेली आहे. त्यामुळे भविष्यात पेडणेवासियांचे अस्तित्व धोक्यात देणार आहे. गावातील आणि मतदारसंघातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण गरजेचे होते. आम्ही केलेल्या सूचना सरकार मान्य करेल असा विश्वास होता. मात्र, हे रस्ते न करता भलतेच रस्ते ४५ मीटर रुंदीचे करून लोकांच्या घरावर बुलडोझर घालण्याचा जो डाव आखला आहे, तो सर्वांनी मिळून हाणून पाडू.

तर राज्याचा आराखडा बदलतील

माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते राजन घाटे म्हणाले, येथे जमीन आराखडा केवळ पेडणे तालुक्याचा बदललेला नाही तर भविष्यात टप्प्याटप्प्याने पूर्ण राज्याचा आराखडा बदलून दिल्ली, सिमलावाल्यांना या भागात आणण्याचा सरकारचा हा कट आहे. भविष्यात शर्मा, कर्मा जरी येथे मुख्यमंत्री झाले तरी कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये.' 

टॅग्स :goaगोवा