पणजी : गोव्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात (एनसीपी)फुट पडली नसून ती एकसंघ आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच गोव्यात कार्यरत असून आम्ही पवार यांच्या सोबत आहोत, असे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
गोव्यात एनसीपी चांगले काम करीत आहेत. अजित पवार यांच्या गटाने शंभू परब यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. मात्र त्यांची ही नियुक्ती असंविधानीक आहे. शरद पवार यांच्या विषय आम्हाला आदर असून आम्ही त्यांच्यासाेबत कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा एनसीपीचे निरीक्षक क्लाईड क्रास्टो म्हणाले, की गोव्यात एनसीपी चे कायदेशीर प्रदेशाध्यक्ष हे जीझे फिलीप डिसोझा हेच आहेत. शंभू परब यांची अजित पवार गटाने प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. परब यांना यासाठी शुभेच्छा आहेत.मात्र त्यांची नियुक्ती ही असंविधानीक आहेत. त्यांच्या या नियुक्तीला कुठलाही कायदेशीर आधार नाही. गोव्यातील पक्षाचे काही ठरावीक कार्यकर्तेच सत्तेसाठी दुसऱ्या गटासोबत गेले. मात्र ते सोडल्यास पक्षाचे सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत अर्थात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात आहेत. जुझे फिलीप डिसोझा हेच गोव्यातील पक्षाचे अधिकृत प्रदेशाध्यक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.