पणजी : शहरामधील दुकानदार अगोदरच केंद्र सरकारची विविध धोरणे आणि जीएसटीसारख्या विषयांमुळे मंदीच्या स्थितीतून जात आहे. यातच आता पोलिसांनी सर्व दुकानदारांना कॅमेरे आणि अन्य सर्वीलन्स यंत्रणा दुकानाला लावा असा आदेश दिल्यामुळे दुकानदारांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
पोलिस सध्या पणजीतील दुकानदारांकडे फिरत आहेत. मोठय़ा व्यापा:यांनी स्वत: अगोदरच कॅमेरे लावलेले असतात. छोटय़ा दुकानदारांना कॅमेरे लावण्याची गरज कधी भासत नाही. तथापि, शहरात चो-या होत आहेत, त्यामुळे तुम्ही कॅमेरे लावा, असे लिहिलेले पत्र पोलिस येऊन दुकानदारांच्या हाती देत आहेत. पणजीतील प्रत्येक दुकानाकडे पोलिस येतात, दुकानाच्या दारावर लावलेला नामफलक ते वाचतात आणि त्यावरील नाव नोंद करून लगेच तिथेच पत्र तयार करून दुकानदाराच्या हाती दिले जाते. दुकानदारांची त्यावर सही घेतली जाते. गणवेषधारी पोलिस प्रथमच आल्याने दुकानदार गोंधळून निमूटपणो सही करून देतात. चो-या आणि मालमत्तेची हानी अशा घटना घडतात व त्यामुळे तुम्ही कॅमेरे व अन्य सर्वीलन्स यंत्रणा लावा असे त्या पत्रात लिहिलेले आहे. कॅमेरे खरेदीवरील खर्च कोण देणार आहे, असे काही दुकानदारांनी नाराज होऊन पोलिसांना विचारले. त्यावर तो खर्च तुम्हीच करायचा आहे असे दुकानदारांना सांगण्यात आले.
अगोदरच आम्हाला दरमहा वीजबिल परवडत नाही. गेल्या तीन वर्षापासून प्रचंड प्रमाणात वीज बिल येत आहे. फ्रिज चालूच ठेवावा लागत असल्याने आम्ही आईस्क्रीम विकणो देखील बंद केले. तशात आता आमच्यावर कॅमेरे लावण्याची सक्ती होत आहे हे आश्चर्यकारक आहे, असे छोटय़ा दुकानदारांचे म्हणणे आहे. पणजीत दुध, बिस्कीटे, किराणा माल, स्टेशनरी व अन्य साहित्य विकणारे हजारो छोटे दुकानदार आहेत. त्यांना कधीच कॅमेरे लावण्याची गरज भासली नाही. छोटय़ा दुकानांमध्ये चो:याही होत नाहीत. या छोटय़ा दुकानदारांना व तेही सर्वच भागातील दुकानदारांना कॅमेरे लावण्यास पोलिस का म्हणून सांगत आहेत असा प्रश्न काही दुकानदारांनी विचारला आहे. आम्ही काही सोनार नव्हे, असेही दुकानदारांचे म्हणणे आहे. या विषयावरून पणजीचे आमदार तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची येत्या आठवडय़ात भेट घेण्याचे काही दुकानदारांनी ठरवले आहे.