(नारायण गावस)
पणजी: गोव्यात हाेणाऱ्या ५४ व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे आली असून यंदा आकर्षक असा महोत्सव हाेणार आहे. फक्त ४ दिवस शिल्लक असल्याने गाेवा मनोरंजन संस्थेच्या वतीने आम्ही सर्व तयारी केली आहे. इफ्फी निमित्त गाेव्यात येणाऱ्या कलाकार व प्रतिनिधींची याेग्य ती काळजी घेतली जाणार आहे, या महोत्सवात कठलीच कमतरता भासली जाणार नाही याची विषेश काळजी घेतली जाणार आहे, असे गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा आमदार डिलायला लाेबो यांनी सांगितले.
यंदाच्या या ५४ व्या इफ्फीसाठी पणजी राजधानी सजू लागली आहे. यासाठी गाेवा मनोरंजन संस्थेचे अधिकारी तसेच सदस्य याेग्यरित्या तयारीचा आढावा घेत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच बैटक घेऊन तायारीचा आढावा घेतला सरकारकडून सर्व सरकारी खात्याचा या महोत्सवाला सहकार्य मिळणार आहे. इफ्फीत कुठलाच अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा कडक असणार आहे ठिकठिकाणी पाेलीस बंदोबस्त असणार आहे. उद्घाटन तसेच समारोपाला उपस्थित असलेल्या कलाकार मान्यवरांची याेग्य ती सोय केली जाणार आहे, असे आमदार डिलायला लोबाे यांनी सांगितले.
इफ्फीत यंदा मोठमाेठे कलाकार येणार असून यात हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारापासून इतर स्थानिक चित्रपटाीतल कलाकार उपस्थित असणार आहे. त्याचप्रमाणे हॉलिवूडूचे परदेशी सिने कलाकारांचा उपस्थिती आकर्षण ठरणार आहे. यंदाचा इफ्फीसाठी प्रतिनिधी नाेंदणी मोठ्या प्रमाणात होत असून यंदा २५ हजाराच्या आसपास इफ्फीची नाेंदणी हाेण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त नाेंदणी हाेण्याची शक्यता आहे.