पणजी : मांडवीवरील तिसऱ्या पुलाचे 87 टक्के काम पूर्ण झाले असून केवळ 13 टक्के काम राहिले असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.
रवी नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला या पुलाचा मुद्दा उपस्थित केला होता. या पुलाचे काम किती झालेले आहे, किती राहिले आहे आणि राहिलेले केव्हा पर्यंत पूर्ण होणार आहे असे त्यांचे प्रश्न होते. तसेच आतापर्यंत किती रुपये खर्च करण्यात आला याची माहितीही मागितली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आतापर्यंत या पुलावर 420 कोटी कंत्राटदार लार्सन अँड टुर्बो कंपनीला दिले असल्याचे सांगितले. आता केवळ 13 टक्के काम राहिले असून त डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असे त्यांनी सांगितले.
या पुलाचे खांबे किती खोल गेले आहेत, प्रत्येक खांबासाठी किती रुपये खर्च आला याची माहितीही नाईक यांनी मागितली होती. परंतु ही माहिती द्यायला आपण काही मोजण्याची टेप घेऊन बसलेलो नाही असे सांगितले. सविस्तर माहिती हवी असेल तर ती नंतर दिली जाईल असे त्यांनी सांगितले.